Maratha Reservation:...तर पंतप्रधान मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी मोदींच्या कालच्या शिर्डी दौऱ्यावर भाष्य केलं आहे.
Manoj Jarange on PM Modi Shirdi Visit amide Maratha Reservation Agitation CM Shinde marathi news
Manoj Jarange on PM Modi Shirdi Visit amide Maratha Reservation Agitation CM Shinde marathi news
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी देण्यात आलेला वेळ संपल्यानंतर जरांगे पुन्हा आंदोलन करत आहेत.

यादरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर आले होते. या वेळी पीएम मोदींनी मराठा आरक्षणावर कुठलंही भाष्य केलं नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर भाष्य केलं आहे.

जालन्यातील अंतरवली सराटी या गावात सुरू असलेल्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना दिल्लीला जाऊन माहिती दिली असेल तर पंतप्रधान मोदी काल जाणूनबुजून याविषयी बोलले नाहीत का? अशी पण शंका आहे.

काल पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणाचा विषय काढला नाही, याचा अर्थ त्यांनी जाणूनबुजून हा विषय त्यांच्या बोलण्यात घेतला नाही, हा संभ्रम आणि शंका मराठा समाजाच्या मनात आहे. पंतप्रधानांना आता गोरबरिबांची गरज राहिली नाही, असा त्यातून अर्थ काढला जात आहे.

सध्या दोन चर्चा आहेत की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून पंतप्रधानांना याबद्दल सांगितलंच नाही किंवा त्यांनी सांगून देखील पंतप्रधान मोदी जाणूनबुजून याविषयी बोलले नाहीत. दोन्हीपैकी एक शंका जनतेच्या मनात आहे, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

Manoj Jarange on PM Modi Shirdi Visit amide Maratha Reservation Agitation CM Shinde marathi news
Babanrao Dhakne Passed Away : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, इतक्या जवळ येऊन देखील पंतप्रधान मोदी देशव्यापी आंदोलन असताना हा विषय घेत नाहीत, याचा अर्थ त्यांनी तो जाणूनबुजून घेतला नाही किंवा त्यांना सांगितला गेला नाही. पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी काढण्याबाबत सांगतील असं मराठा समाजाला वाटलं होतं.

पंतप्रधानांबाबत मराठ्यांच्या मनात काही वाईट भावना नव्हती. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याबाबत वाईट भावना असती तर त्यांनी पंतप्रधानांचं विमान शिर्डीला खाली देखील उतरवू दिलं नसतं, वरचेवरच लावलं असतं असेही मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange on PM Modi Shirdi Visit amide Maratha Reservation Agitation CM Shinde marathi news
PM Modi In Shirdi: शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरीबांना आशा होती. पण या तिघांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा संदेश महाराष्ट्रात आणि देशात गेला आहे असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. घेतला गेला नाही किंवा त्यांना सांगितला नाही.

पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी काढण्याबाबत असं मराठा समाजाला वाटलं होतं. पंतप्रधानांबाबत मराठ्यांच्या मनात काही वाईट भावना नव्हती. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याबाबत वाईट भावना असती तर त्यांनी पंतप्रधानांचं विमान शिर्डीला खाली देखील उतरवू दिलं नसतं, वरचेवरच लावलं असतं असेही मनोज जरांगे म्हणाले.

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरीबांना आशा होती. पण या तिघांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा संदेश महाराष्ट्रात आणि देशात गेला आहे असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()