Maratha Reservation : सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय! सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंची खुली चर्चा

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या धुरिणांची एक बैठक बोलावली आहे, त्यापूर्वी...
Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या धुरिणांची एक बैठक बोलावली आहे. त्या बैठकीपूर्वी सरकारने आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

शनिवारी रात्री सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भूमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माध्यम प्रतिनिधींच्या समोरच तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधाने मोठी अपडेट दिली.

एकनाथ शिंदे सोमवारी सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या संबंधाने महत्त्वाची माहिती देणार आहेत, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती महाजन यांनी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे सोमवारी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय जाहीर करु शकतात, असं दिसून येतंय. महत्त्वाचं म्हणजे तारखेच्या बाबतीत जरांगे पाटलांनी विचार करावा, अशी मागणी महाजन यांनी केली.

Maratha Reservation
CSK Reaction On Rohit Sharma : चेन्नईनं रोहितसाठी केलं ट्विट, रितिकानं दिलेली प्रतिक्रिया सांगून गेली सर्व काही

शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली?

  • २४ तारखेच्या अल्टिमेटमवर विचार करा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी जरांगे पटलांकडे केली आहे. त्यावर जरांगे पाटलांनी रविवारच्या समाजाच्या बैठकीत चर्चा करु, असं म्हटलं.

  • ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आणि त्यावरुन जरांगेंनी समाधान व्यक्त केलं. उपोषण सोडताना कागदावर जे लिहून दिलेलं होतं, त्याप्रमाणेच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी जरांगेंनी केली. त्याला महाजनांनी होकार दिला.

  • मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन आणि विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल, असंही गिरीश महाजन बोलताना म्हणाले.

Maratha Reservation
Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; पसार झालेला आरपीएफमधील हवालदार अटकेत

दरम्यान, आंतरवाली सराटी इथं रविवारी मराठा समाजबांधवांची एक बैठक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे. या बैठकीमध्ये २४ तारखेनंतरच्या आंदोलनाची रुपरेषा ठरणार आहे. मात्र सरकारला आणखी वेळ द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर काय निर्णय होतो, हे बैठीकनंतर स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.