Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal Death Threat Latest News : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा तसेच मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी साल्हेर किल्ल्याजवळ घातपाताचा प्रयत्न झाल्याची शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
भुजबळांना देण्यात आलेल्या धमकीवर बोलताना जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे पोलीस त्यांना द्या, त्यांना पोलीसांचे कपडे घाला. त्यांना कशाला कोण मारेल? म्हतारा माणूस आहे त्यांना कशाला कोण मारेल? त्यांना कोणत्याच जातीचा समाजाचा व्यक्ती धमकी देऊ शकत नाही.म्हताऱ्या माणसाची माया करण्याचे संस्कार पुरोगामी महाराष्ट्रावर आहेत.
पुढे बोलतना जरांगे म्हणाले की, आम्ही भीत नाहीत, तुझ्यासारखं कोणाला सांगत देखील नाहीत. ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला सांगतात की, मला संरक्षण द्यायला सांगा. आम्हाला भीती असून आम्ही सांगत नाहीत. आमच्यासोबत असं सात वेळा घडलं, पण आम्ही सांगितलं नाही.
साल्हेर किल्ल्यावरसुद्धा आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला आम्हाला माहिती आहे, पण आम्ही संरक्षण द्या किंवा घातपाताचा प्रकार आहे असं म्हणालो नाही. तुझ्यासारखे असे भंगार चाळे आम्ही करत नाही. हे सांगायचं नव्हतं पण त्यांनी काढलं म्हणून...
आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. जाताना काहीच नव्हतं. चढ असल्याने गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. बहुतेक मध्ये पन्नास मीटर अंतरावर कुठतंरी एक रस्ता होता. मला पुढे गेल्यावर लक्षात आलं की पोलीस घाई करत होते. माझ्या लक्षात आलं की, खाली काहीतरी घडलं आहे. कारण पोलीसांमध्ये आपापसात चलबीचल सुरू झाली होती. एक पीकअप सारखं काहीतरी मधूनच वेगाने उतारावरून खाली आलं. त्यामुळे खालच्या पाच ते सात गाड्यामधील माणसं आणि गाड्यांचा भुगा झाला असता. पण लोक ओरडले आणि उड्या मारून खड्ड्यात पडले.
पोलीसांनी त्या ड्रायव्हरला पकडलं. तेव्हा त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की त्याला पिकअप घालायला सांगितल म्हणून.... मी हे खरं की खोटं तपासायला सांगितलं.... त्याच्याविरोधात आमची काही तक्रार नाहीये... पण याची चौकशी करा. मला मुद्दाम गाड्यांवर पिकअप घालायला सांगितलं असं त्या ड्रायव्हरने कोणाचं नाव घेत सांगितलं, त्याची चौकशी करा, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
हा घातपाताचा प्रकार असेल असे वाटतं का? असे विचारलं असता जरांगे म्हणाले की, असू शकतो, अन्यथा किल्ल्यावर ते आलं कुठून? आम्हाला जाताना काहीच दिसलं नाही, मग ते तिथं आधीच ठेवलं होतं. उतार असल्याने गिअर टाकून सोडून दिलं, हे आम्ही सांगत बसत नाही. हिंगोलीच्या सभेत काय झालं हे आम्ही सांगत बसलो नाही, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
तुम्हाला देखील धोका आहे का? या प्रश्नावर जरांगे म्हणाले की मला काही धोका नाही, मी मरायला भीत नाही, मी क्षत्रीय मराठ्याचा आहे मरायला भीत नसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.