Maratha Reservation: ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपे असं का म्हणाले?; मराठा आंदोलनाच्या SIT चौकशीच्या आदेशानंतर दिली प्रतिक्रिया

Maratha Reservation: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. आज (मंगळवारी, २७ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on

Maratha Reservation:

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. आज (मंगळवारी, २७ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.  मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. 

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचे म्हटले होते. मला विष देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा मुलांच्या न्याय हक्कासाठी आहे. गरीब मराठा समाजाचं भल्ल व्हावं हा त्या मागचा उद्देश आहे. जरांगे पाटील यांचा पूर्व इतिहास पाहिला की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यसाठी ते काम करतात. शिवबा नावाच्या संघटनेच्या माध्यमातूनही ते काम करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्या जिल्ह्यांचा पालकमंत्री असताना त्यांनी सर्वाधिक १०५ दिवस उपोषण केलं, असे राजेश टोपे म्हणाले.

त्यावेळी हुतात्मा मुलांना मदत दिली जात नाही, नोकरी दिली नाही, अशा मागण्या मनोज जरांगे यांच्या होत्या. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीची मागणी केली होती. ठाकरेंना भेटून त्यांच्या मागण्या पू्र्ण केल्या होत्या. भांबेरी गावात मोठा लढा होता, शाहगड  गावात आंदोलन केले.  मी पालकमंत्री असताना मनोज जरांगे आदोलन करायचे. आम्ही आता विरोधात आहोत म्हणून आमच्यावर आरोप होत आहेत. माझा भागात ते १० किलोमीरवर आंदोलन करत आहेत. माझा मतदार संघात ते होतं आहे तर माणूसकीच्या नात्याने मी मदत केली तर चुकीचं काय?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

जरांगे पाटील यांच्या संपर्कात थेट सरकार आहे. आम्ही लोकल आमदार म्हणून शिष्ठमंडळासोबत होतो ही आमची जबाबदारी आहे. मी सर्व समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझा भागात धनगर समाजाचे आंदोलन झाले त्यांनाही मी स्टॉल उभारून मदत केली. मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, आमचा डिएनए काय आहे हे सर्वांना माहित आहे.  मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचाही डिएनए तोच आहे आम्ही जातीयवाद काही करत नाही. वरच्या सभागृहात जे आरोप झाले ते खोटे आहेत आणि बिनबुडाचे आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार! शासन निर्णयासह राजपत्र जारी

माझ्याबाबत जे सांगितले आहे त्यात सत्यता नाही. मी कधी दगाफेक केली नाही. मी अंतरवालीला गेलो होतो तर ज्यांना मार लागला त्यांच्यावर उपचार व्हावे, मदत लवकर मिळावी या काळजी पोटी केली. सर्व प्रकारच्या चौकश्या व्हाव्यात. माझा काहीही संबध नाही. माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहित आहे. आपली माध्यमं तिथे होती ५ किलोमीटरवर माझा कारखाना आहे. ज्यांची राहण्याची व्यवस्था नाही ते कारखान्यावर यायचे. मुख्यमंत्री जरी आले तेव्हा त्याच कारखान्यांच्या मैदानात उतरले होते, असे राजेश टोपे म्हणाले.

माहिती नसताना ऐकीव माहितीवर बोलणे योग्य नाही. सर्व पक्षातील नेते तिथे होते होते ते समाज म्हणून. मी १ टक्का जरी माझा सहभाग असेल तर कारवाई करा, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे टोपे म्हणाले. 

Maratha Reservation
Who Is Captain Prashant Nair : कोण आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर? ज्यांच्या नेतृत्वात अंतराळात जाणार 'गगनयान मिशन'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.