Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. आज नगर जिल्ह्यात शेवगाव येथे जरांगे पाटील यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाज उचकला पाहिजे, हे सरकारच्याच प्रतिनिधीकडून चाललंय अशी मला अधिकृत माहिती मिळाली आहे. जाणूनबुजून जाती जातीत द्वेष निर्माण करून बॅनर फाडायला लावले. याचे मागे भुजबळ यांच्याच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी काल (बुधवार) छगन भुजबळांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
पाटील म्हणाले, "राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात दंगल होऊ नये, यासाठी आम्ही रात्रंदिवस बैठका घेत आहोत. पोलिस आमच्यावर कारवाई करत आहेत. दुसरीकडे भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांना साथ देत आहेत का? सरकार दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहे का? राज्य सरकारने आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही आणि थांबणार नाही. मराठ्यांच्या हितासाठी मी कोणताही गुन्हा करण्यास तयार आहे." (Latest Marathi News)
अजित पवारांबाबत मनोज जरांगे म्हणाले, "जर अजितदादा काल म्हणत असतील, मी त्यांना तंबी दिली. तर नेमकी कोणती तंबी दिली? मराठ्यांचे बोर्ड फाडण्याची?. इथून पुढे शांतता राहावी म्हणून दिली. तुम्ही यात बारकाईने लक्ष घालणे गरजेचं आहे. आम्ही मराठ्यांना शांत केले."
मनोज जरांगे म्हणाले, आता आरक्षण २ दिवस लेट मिळालं तरी चालेल पण आमचे पुरावे बुडाखाली कुणी लपवून ठेवले, हे समोर आलं पाहिजे.हे आंदोलन पहिलं आणि शेवटचं पण आरक्षण घेऊनच राहायचं. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप सुरू झालंय. ३२ लाख नोंदी सापडल्या, दीड ते दोन कोटी समाज त्याचा फायदा घेऊ शकेल. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, या हेतूने सरकार आज काम करत आहे.
अधिवेशनात कायदा करावा, ही आमची मागणी होती. सरकारने अधिवेशन कालावधी वाढवलाय. आरक्षण देण्यासाठी वाढवला असेल तर चांगली गोष्ट आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.