Maratha Reservation : 'मराठा आरक्षण हाच माझा उपचार'; जरांगेंचं सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राज्यातील नेत्यांना आवाहन

Maratha Andolan manoj jarange
Maratha Andolan manoj jarange
Updated on

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. यादरम्यान मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हाच माझ्यासाठी उपचार असेल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच असून आज त्यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. तसेच जरांगे यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं घेणंही बंद केलं आहे. त्यांनी सलाईनही काढलं आहे.

Maratha Andolan manoj jarange
Sharad Pawar : अजित पवार अन् त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान आज होत असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीबद्दल मी यापूर्वीही बोललो आहे, मराठा समाजाने सर्व पक्षांना भरभरून दिलं आता त्यांचा मराठा समाजाला देण्याचा नंबर आहे. सगळा महाराष्ट्र पाहतोय की कोणता पक्ष आम्हाला साथ देतोय. कोणता पक्ष किती ताकदीने उभं राहतो आणि कोण कोणावर अन्याय करतो ते आज आमच्या लक्षात येईल, असे मत मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आम्हाला आरक्षण पाहीजे आणि ते ही महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र हवं आहे. हे भीजत घोंगडं ठेवू नका, तुम्हाला जे काही करायचं ते करा असं अवाहन जरांगे यांनी सर्व पक्षांना केलं.

Maratha Andolan manoj jarange
Pune Crime News : पुण्यात पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या! सात महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी; परिसरात एकच खळबळ

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना भरभरून दिलं. आता ते किती साथ देतात आणि आरक्षणासाठी मनातून काम करतात, त्यांच्या मनात किती खोट आहे की प्रेम आहे ते आज उघडं पडणार आहे.महाराष्ट्र आज सत्ताधारी आणि विरोधीपक्षांकडे पाहतो आहे असेही जरांगे पाटील म्हणाले. ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ देऊ नका, पण आमच्यावर देखील अन्याय करू नका असेही ते म्हणाले.

उपचार सोडल्याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, माझा उपचारचं मराठा आरक्षण आहे, आज जी सर्वपक्षीय बैठक लागली त्यात माझ्या वेदनावर सर्वांनी उपचार करावे. माझ्या समाजाच्या वेदना आहेत त्याच वेदना माझ्या आहेत, माझे उपचार म्हणजेच मराठा आरक्षण आहे. माझी जात, माझा समाज मला प्रिय आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()