Manoj Jarange: मागासवर्ग आयोगाच्या निकष बदलांच्या चर्चांवर जरांगेंनी प्रतिक्रिया; म्हणाले, यासाठीच...

मागास वर्ग आयोग कुठला समाज मागास आहे यासाठीच्या सर्व्हेक्षणाचे निकष बदलणार असल्याची चर्चा आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange Esakal
Updated on

मुंबई : मागास वर्ग आयोग कुठला समाज मागास आहे यासाठीच्या सर्व्हेक्षणाचे निकष बदलणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मागासवर्ग आयोग जर मराठा समाजावर अन्याय करणार असेल तर मग तोच निकष बाकीच्या आरक्षणाला देखील लावावा लागेल, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Manoj Jarange reacts on changing a criteria of survey of Backward Classes Commission)

Manoj Jarange
Ajit Pawar: "तीन-चार महिन्यांत अजित पवार जेलमध्ये दिसतील"; शालिनीताई पाटलांचा घणाघात, हायकोर्टात दाखल करणार याचिका

जरांगे म्हणाले, "मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर मग आम्हाला जो निकष लावलाय तोच बाकीच्या आरक्षणाला देखील लावावा लागेल. त्यांनासुद्धा मागं काढावं लागेल. म्हणजे आम्हाला एक न्याय आणि त्यांना एक न्याय असं चालणार नाही. (Latest Marathi News)

Manoj Jarange
'Dunki’ Flight: 'डंकी'चा संशय! फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान 276 प्रवाशांसह मुंबईत लँड; इतर 24 जणांचं काय?

यासाठीच मी तिकडचा विषय नको म्हणत होतो. कारण आमच्या नोंदी मिळाल्या आहेत तर मग सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन टाका. मागासवर्ग आयोग निकष बदलणार असेल तर यासाठीच हा विषय नको म्हणतोय, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.