Maratha Reservation : तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात, उडी मारायचा विचार आहे का? जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

मनोज जरांगे आणि काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आमने सामने आल्याचे पाहयला मिळत आहे.
Manoj Jarange  reply to Vijay wadettiwar allegations maratha reservation protest
Manoj Jarange reply to Vijay wadettiwar allegations maratha reservation protest
Updated on

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे आणि काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आमने सामने आल्याचे पाहयला मिळत आहे. वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला असून त्यांना जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जनतेला न्याय देण्याचं काम विरोधीपक्षनेता म्हणून त्यांच्याकडे आहे. पण त्यांना गोरगरीब आता आठवत नाहीयेत. कोण कोणासाठी करतंय ते मराठ्यांना चांगलं माहिती झालं आहे. तुम्ही मराठ्यांना सल्ले देऊ नका. तुम्ही ओबीसीमध्ये मराठ्यांनी येऊ नये असं सांगता हे देशात कुठंच नाही. तुमची विचारधारा किती मराठ्यांविरोधात विष पेरणारी आहे हे मराठ्यांना देखील माहिती आहे. तुमच्या मनात कधीच मराठ्यांच्या मनात माया नाही, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

आम्ही हीरो नाही झालो, आम्ही स्वतःला हीरो देखील मानत नाहीत, म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारलं. तुम्ही सर्वांनी सत्ताधारी आणि विरोधातील पक्षांनी आम्हाला मोडायचं ठरवलं होतं. तुम्हा दोघा-तिघांना आमचं आदोलन संपवायचं होतं. त्यामुळे तुम्ही सामुहिक कट रचला होता. आम्ही हीरो नाही झालो. आम्ही लढायचं ठरवलं म्हणून आमचा समाज सोबत आहे. तुम्ही सभ्रम निर्माण करू नका, ते होणार नाही. तुमची भावना काय आहे, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचा किती वापर केला ते लोकांना माहिती आहे.

Manoj Jarange  reply to Vijay wadettiwar allegations maratha reservation protest
Maratha Reservation: “मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

वंशावळीच्या नोंदी मिळालेल्या असताना देखील तुम्ही विरोध करता, मराठ्यांच्या पोरांना मागे उभं राहू नका म्हणता. मग तुमच्या मागे उभे राहतील का? तुम्ही आमचे शत्रू झालात. वंशावळीच्या नोंदी असताना तुम्ही आरक्षणात येऊ देत नाहीत, म्हणून सर्वाधिक तुम्ही मुडदे पाडायला जबाबदार आहेत, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

विरोधपक्षनेता जनतेला न्याय देणारं घर आहे. हक्काचं न्यायमंदिर आहे. आता त्यांनाच स्वतःच्या जातीचा गर्व झाला आहे. विरोधीपक्ष नेते एकच जात घेऊन जात आहेत. असले विचार असल्यावर तुमचा पक्ष कसा राहिल. राहुल गांधी यांनी मराठ्यांना विरोध करायचा एवढंच शिकवलं का? यासाठी तुम्हाला घटनेचं पद दिलं का? असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी केला.

टाइमबाँड दोन दिवसात देऊ असे म्हणालात, आम्ही म्हणालो लवकर द्या. जनता आवाज उठवेल, ही तुम्हाला धमकी वाटते का? तुम्ही सत्तेत आहात का? सरकारला बोललेलं तुम्हाला का वाईट वाटलं. तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात म्हणजे तुमच्यावर दडपण आणलं काय? की तुमचा काही उडी मारायचा विचार आहे? आम्हाला राजकारणासाठी करत असल्याचा डाग कशाला लावता? तुमचं तुम्ही बघा. मराठ्यांना माहिती आहे की राजकारणासाठी करतो की न्यायासाठी करतो ते... राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला लगेच आरक्षण मिळालं असतं. तरी या पठ्ठ्याने सांगितलं महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांसाठी हवंय आणि समितीला राज्यभर काम करायला लावा. आता आज राज्यभर सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत.

तुम्ही म्हणताय तर आहे गर्व, मला गर्व आहे की कानाकोपऱ्यातील मराठा समाज एक झालाय असेही जरांगे यावेळी म्हणाले.

Manoj Jarange  reply to Vijay wadettiwar allegations maratha reservation protest
Pakistan In WC 2023 : पाकिस्तान जिंदा'भाग'... विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा पाकिस्तानची खेचली

वडेट्टीवार काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत अनेक आऱोप केले आहेत. मराठा समाजला EWS मधून १० टक्के फायदा होत असेल तर तो मोठा फायदा आहे. मात्र मनोज जरांगे यांची राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका दिसते. जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाही तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहे,असे वडेट्टीवार म्हणाले.

तसेच मराठा समाजला ओबीसींच्या ३७२ जातींमध्ये येऊन फार फायदा होणार नाही. EWS मध्ये जास्त जाती नाहीत. मराठा तरुणांनी याचा विचार करावा, जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये. त्यांनी अभ्यास करुन भविष्याचा निर्णय घ्यावा, असेही आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.