Manoj Jarange Sabha : अन् जरांगेंच्या इशाऱ्यावर एका मिनिटात लाखोंच्या सभेने रुग्णवाहिकेला वाट करून दिली...

मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे.
Manoj Jarange Sabha crowd made way for an ambulance after Medical emergency Jalna Maratha reservation
Manoj Jarange Sabha crowd made way for an ambulance after Medical emergency Jalna Maratha reservation
Updated on

मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भव्य सभा आजोजित करण्यात आली. या सभेला राज्यभरातून मराठा सामाज बांधवाणी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अंतरवाली सराटीतील या सभेसाठी आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य सेवा पुरवण्यात आली, ज्याचा फायदा झाल्याचं पाहयला मिळालं.

जरांगे यांचं भाषण सुरू असताना या आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे पाहयला मिळाले. विशेष म्हणजे या गरज पडताच मराठा समाज बांधवाणी रुग्णवाहिकेला मिनीटभरात गर्दीतून वाट करून दिल्याचं पाहायला मिळालं. आरोग्याची समस्या उद्भवल्यास याठिकाणी आरोग्य सेवेची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

शिवरायांना वंदन करून साडेअकराच्या सुमारास मनोज जरांगे यांच्या सभेला सुरूवात झाली. सभा सुरू असताना अचानक आरोग्य सेवेची गरज भासल्याने सभास्थळी रुग्णवाहिका आणावी लागली. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावरून रुग्णवाहिकेसाठी तात्काळ वाट मोकळी करून देण्याची आवाहन नागरिकांना केलं.

मनोज जरांगे यांच्या मागणीला मराठा बांधवांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि अवघ्या काही मिनीटांत रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन गर्दीतून वाट काढत सभास्थळाहून बाहेर पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बघा बरं लोकं म्हणतात की मराठे वाट देत नाहीत, मराठ्यांनी दणादण वाट करुन दिली, अशी मिश्कील टिप्पणी देखील यावेळी केली. दरम्यान सभास्थळी उपस्थित रुग्णवाहिकेत पेशन्टला बाहेर नेण्यात आलं.

या सभेसाठी मोठी तयारी करण्याता आली होती. सभेच्या ठिकणी १०० एकरहून अधिक जागेची व्यवस्था, तसेच तेवढ्याच मोठ्या पार्किंगची देखील सोय करण्यात आली होती.

Manoj Jarange Sabha crowd made way for an ambulance after Medical emergency Jalna Maratha reservation
"माझा मराठा समाज उन्हात मी देखील उन्हात सभा घेणार"; मनोज जरांगेंची व्यासपीठावरील छत काढण्याची विनंती

आरोग्य सेवेसाठी चोख व्यवस्था

नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता उपाययोजना म्हणून जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाच रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांची टीम आणि ३० ते ३५ परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची टीम अंतरवाली सराटी गावात दाखल झाली होती. तसेच गरज भासल्यास अंबड उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व जिल्हा सामान्य रुग्णालयात शंभर खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. सभास्थळी सामाजिक संघटना व खाजगी रुग्णालयांमार्फत ५० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Manoj Jarange Sabha crowd made way for an ambulance after Medical emergency Jalna Maratha reservation
"जनतेचे पैसे खाल्ले अन् दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले"; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.