Manoj Jarange Route For Mumbai : अंतरवाली सराटी ते मुंबई... जाणून घ्या जरांगेच्या यात्रेचा संपूर्ण मार्ग अन् वेळापत्रक

Manoj Jarange Mumbai Protest Plan मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २० जानेवारी रोजी मुंबईसाठी निघणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईकडे कूच करणार आहेत.
Manoj Jarange Yatra route Schedule antarwali sarati to azad maidan mumbai timetable maratha reservation agitation
Manoj Jarange Yatra route Schedule antarwali sarati to azad maidan mumbai timetable maratha reservation agitation Sakal
Updated on

Manoj Jarange Route For March To Mumbai : मराठा आरक्षणासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपली आहे. यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २० जानेवारी रोजी मुंबईसाठी निघणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईकडे कूच करणार आहेत.

जरांगे या यात्रेनंतर २६ तारखेला मुंबईला पोहचल्यानंतर आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू करतील. यापूर्वी २० जानेवारीला सुरू होणाऱ्या या मुंबई प्रवासादरम्यान मुक्काम कुठे-कुठे असणार आहे. तसेच यात्रा कोणत्या मार्गाने जाईल याबद्दल जरांगे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार करीत मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार आहेत. यावेळी अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना त्यांचा मार्गआणि मुक्कामाच्या ठिकाणाची घोषणा आज करण्यात आली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावातून २० जानेवारी रोजी यात्रेला सुरूवात होणार आहे.

Manoj Jarange Yatra route Schedule antarwali sarati to azad maidan mumbai timetable maratha reservation agitation
Sharad Mohol Murder : कातील सिद्दीकी हत्येमुळेच मोहोळवर गोळीबार; हिंदूत्ववादी संघटनाचा दावा, पुण्यात काढणार जनमोर्चा

असा असेल मनोज जरांगे यांच्या यात्रेचा संपूर्ण प्रवास

१) २० जानेवारी - पहिला दिवस : अंतरवाली ते मातोरी.

अंतरवालीतून पायी-वाहन यात्रेला सुरुवात होईल. अंतरवालीतून सकाळी ९ वाजता शुभारंभ होऊन, कोळगाव ता. गवराई येथे दुपारचे जेवण होईल, मातोरी ता. शिरूर येथे मुक्काम व जेवण.

२) २१ जानेवारी - दुसरा दिवस : मातोरी ते करंजी बाराबाभळी.

मातोरीतून सकाळी ८ वाजता निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी येथे दुपारचे जेवण, बाराबाभळी-कारंजी बाट ता. नगर येथे मुक्काम / जेवण होईल.

३) २२ जानेवारी - तिसरा दिवस : बाराबाभळी ते रांजणगाव.

बाराबाभळीतून सकाळी ८ वाजता निघणार, सुपा ता. पारनेरे दुपारी जेवण, रांजणगाव ता. शिरूर येथे मुक्काम/जेवण.

४) २३ जानेवारी - चौथा दिवस : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.

रांजणगावातून सकाळी ८ वाजता, कोरेगाव भिमा येथे दुपारी जेवण, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम/जेवण होईल.

Manoj Jarange Yatra route Schedule antarwali sarati to azad maidan mumbai timetable maratha reservation agitation
Lok Sabah Election : ना मोदी, ना राहुल गांधी... एकला चलो रे! मायावतींनी सांगितलं स्वबळावर लोकसभा लढवण्याचे कारण

५) २४ जानेवारी - दिवस पाचवा : खराडी बायपास ते लोणावळा.

चंदन नगर, खराडी बायपास येथून सकाळी ८ वाजता निघणार, तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण, लोणावळा येथे मुक्काम/जेवण.

६) २५ जानेवारी - दिवस सहावा : लोणावळा ते वाशी

लोणावळाहून सकाळी ८ वाजता निघणार, पनवेल ता, नवी मुंबई येथे दुपारी जेवण, वाशी येथे मुक्काम/जेवण.

७) २६ जानेवारी - दिवस सातवा: वाशी ते आझाद मैदान-मुंबई

वाशीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करून निघणार, आझाद मेदान किंवा शिवाजी पार्क मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार.

२६ जानेवारी - आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.