Mantralaya : मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, परिसरात काटेकोर सुरक्षा

 Mantralaya
Mantralayasakal media
Updated on

मुंबईः मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी घाबरु नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव बाळकृष्ण ढाकणे असं सांगितलं जात आहे. तो अहमदनगरचा असल्याची माहिती मिळतेय. या निनावी फोननंतर मंत्रालयाच्या बाहेर सुरक्षा वाढविण्यात आलीय.

श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथक मंत्रालय परिसरात तपासणी करत आहे. मंत्रालयात येणाऱ्या गाड्यांची सखोल तपासणी केली जातेय.

 Mantralaya
मुंबईमध्ये दाखल होताचं 'राहुल गांधी वापस जाओ'च्या घोषणा, भाजपचे कार्यकर्ते 'या' कारणामुळे आक्रमक

पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाची तपासणी पूर्ण झालेली आहे. कुठेही बॉम्ब नसल्याची पोलिसांनी खात्री केलीय. कुठल्याही कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

 Mantralaya
INDIA आघाडीची बैठक सुरू असलेल्या 'ग्रँड हयात' हॉटेलमधील रुमचं एका दिवसाचं भाडं किती?

पंधरा दिवसांमध्ये दुसरा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासकार्य केलं. परंतु कसलाही बॉम्ब नसल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.