Railway: या महत्वाच्या कारणामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या होत आहेत लेट

या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या मार्गवरील उपनगरीय अप मार्गावरील लोकल सेवा सकाळी १० ते १५ मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Akola Marathi News Rs 7 lakh compensation to women involved in railway accident
Akola Marathi News Rs 7 lakh compensation to women involved in railway accident
Updated on

दाट धुक्यामुळे सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेनसह अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांना फटका बसला आहे. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने त्यांच्या परिणाम उपनगरीय लोकल सेवावर शुक्रवारी दिसून आला. त्यामुळे मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांसह उपनगरीय प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत फटका बसत आहे. शुक्रवारी खंडाळा आणि कसारा घाटातील धुक्यामुळे सकाळी मुंबईला येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळापेक्षाही विलंबाने धावत होत्या.

Akola Marathi News Rs 7 lakh compensation to women involved in railway accident
Central Railway: सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल! नागपुर स्थानकावरुन जाणार 'या' गाड्या

त्यातच पुणे आणि सोलापूर दरम्यान असलेल्या दौंड सेक्शनमध्ये पहाटेपासून प्रचंड धुक्यामुळे सकाळी ६ वाजता सोलापूरहून सुटलेली सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेन सीएसएमटी स्थानकांवर सव्वा दोन तास विलंबाने पोहचली.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-होसपेट एक्सप्रेस, सीएसएमटी-हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस, एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.

या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या मार्गवरील उपनगरीय अप मार्गावरील लोकल सेवा सकाळी १० ते १५ मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Akola Marathi News Rs 7 lakh compensation to women involved in railway accident
Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !

रुळ दिसण्यास अडचण

दाट धुके असल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या लोको पायलटना रुळ, सिग्नल दिसण्यास अडचणी येतात. हवेतील दृष्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मेल-एक्स्प्रेस-लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.

परिणामी मेल-एक्स्प्रेस हळूहळू चालविण्यात येतात. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांना आपल्या निर्धारित वेळापेक्षा उशिराने येत असल्याने लोकल सेवांना फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.