Monsoon Session: 'गटाचं टेन्शन अन् बसायचं कुठे?' राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मारली दांडी

Rashtravadi Congress : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे
Monsoon Session
Monsoon SessionEsakal
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे आज विरोधक सुरवातीलाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत धारेवर धरलं आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात पावसाची गंभीर स्थिती आणि दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यानंतर थोड्याच वेळात विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला.

Monsoon Session
Monsoon Assembly Session: विरोधी पक्ष नेते पदाच्या दालनात अजित पवार! विरोधी पक्ष नेत्याला ऑफिस नाहीच?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नव्हतं मात्र हे आज स्पष्ट होईल अशा चर्चा सुरू होत्या मात्र राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजाकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे. कोणत्या गटात कोण आहे, हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणे टाळल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Monsoon Session
Monsoon Session : 'यांना मंत्रिमंडळाचा विस्तार-खातेवाटप करायचं, दिल्लीला जायचं…'; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग

अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटंले होते. 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजाकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे.

राष्ट्रवादी एकूण आमदार ५३ आहेत. नवाब मलिक तुरुंगात आहेत त्यामुळे ५२ आमदार आहेत, त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते. शरद पवार गटाचे ९ आमदार उपस्थित होते. तर एकूण २४ आमदार अनुपस्थित होते.

Monsoon Session
Monsoon Assembly Session : विरोधी पक्ष नेता कोणाला करावे? रोहित पवारांनी काँग्रेसला केली ही विनंती

शरद पवार समर्थक आमदार उपस्थित

जयंत पाटील

अनिल देशमुख

बाळासाहेब पाटील

सुनील भूसारा

राजेश टोपे

प्राजक्त तनपुरे

सुमन पाटील

रोहीत पवार

मानसिंग नाईक

शरद पवार यांना समर्थन देणारे हे आमदार विरोधी बाकावर बसले होते.

तर अजित पवार गटातील हे आमदार उपस्थित होते

अजित पवार

धनंजय मुंडे

दिलीप वळसे पाटील

हसन मुश्रीफ

छगन भुजबळ

धर्मराव अत्राम

अनिल भाईदास पाटील

संजय बनसोडे

अदिती तटकरे

बबन शिंदे

इंद्रनील नाईक

प्रकाश सोळंके

किरण लहमाटे

सुनील शेळके

सरोज अहिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.