Accident News: ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेच्या धक्क्याने 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

विजेच्या धक्क्याने 10 जणांचा मृत्यू, अलकनंदा नदी काठावर घडली दुर्घटना
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

उत्तराखंडच्या चमोली येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला झाल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झाला. (Latest Marathi News)

या घटनेत 1 पोलिस कर्मचारी व 2 होमगार्डही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे.​ दुसरीकडे,​​​​​​ उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पिपळकोटीच्या आऊट पोस्ट इन्चार्जचाही समावेश आहे.

चमोली मार्केटजवळील नमामि गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी वीजेच्या धक्क्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पिपळकोटी चौकीचे प्रभारी प्रदीप रावत आणि होमगार्ड मुकंदीलाल यांचाही या अपघातामध्ये समावेश आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, चमोली येथील नमामी गंगे प्रकल्पाचे काम सुरू आहे. बुधवारी हा अपघात झाला त्यावेळी 24 जण घटनास्थळी उपस्थित होते, सुमारे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रकल्पाच्या साइटवर आज सकाळी विजेचा तिसरा फेस डाऊन झाला होता. हा फेस टाकताना करंट पसरल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Accident News
Marathi News Update: मुंबईसह देशभरातील पावसाची स्थिती जाणून घ्या, एका क्लिकवर

त्याचबरोबर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. डीएसपी प्रमोद शाह यांनी सांगितले की, मृतांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.(Latest Marathi News)

चमोलीच्या ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी अभियंता अमित सक्सेना यांनी सांगितले की, काल रात्री तिसऱ्या टप्प्यातील वीज खंडित झाली होती. बुधवारी सकाळी तिसरा टप्पा जोडण्यात आला, त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात विद्युत प्रवाह सुरू झाला. एलटी आणि एसटीच्या तारा ट्रान्सफॉर्मरपासून ते मीटरपर्यंत कुठेही तुटलेल्या नाहीत, मीटरनंतर तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू आहे. प्रकल्पाच्या साइटवर आज सकाळी विजेचा तिसरा फेस डाऊन झाला होता. हा फेस टाकताना करंट पसरल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Accident News
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता स्थापन होणार टास्क फोर्स

हा अपघात कसा झाला

रात्री येथे राहणाऱ्या केअरटेकरचा फोन लागत नसल्याचे नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन शोधाशोध केली. त्यानंतर केअरटेकरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. माहिती मिळताच कुटुंबीयांसह अनेक ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले. येथे पोहोचल्यावर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यादरम्यान पुन्हा विद्युत प्रवाह तेथे पसरला. यांच्या संपर्कात अनेकजण आले.(Latest Marathi News)

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी डीएम चमोली यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. जखमींना डेहराडूनला आणले जात असल्याचे सांगितले आहे.

Accident News
Mumbai Local: मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.