'प्रदीप भिडे यांच्या निधनामुळे पत्रकार सृष्टी एका सच्च्या पत्रकाराला मुकली'

अनेक नेत्यांनी पत्रकार प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली वाहिली
Pradip Bhide News
Pradip Bhide Newsesakal
Updated on

मुंबई : प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणतात, ज्येष्ठ वृत्तनिवेदक व प्रसिद्ध सूत्रसंचालक श्री.प्रदीप भिडे (Pradip Bhide) यांच्या निधनाने दूरदर्शनचा चेहरा हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! दुसरीकडे माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री प्रदीप भिडे यांच्या निधनामुळे पत्रकार सृष्टी एका सच्च्या पत्रकाराला मुकली. अतिशय लोभस आणि राजबिंडं व्यक्तिमत्त्वाचे प्रदीप भिडे त्यांच्या खास आवाज आणि लकबीमुळे कायम लक्षात राहतील. त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रम दिले. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. (Many Political Leaders Pay Tributes To Senior Journalist Pradip Bhide)

Pradip Bhide News
त्या दिवशी प्रदीप भिडे यांच्या निवेदनाने अख्ख्या महाराष्ट्राला रडवलेलं

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. आपल्या खास शैलीने सूत्रसंचालन, वृत्तनिवेदन करणारे ख्यातनाम वृत्तनिवेदक काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

- पंकजा मुंडे

मराठी बातम्यांचा बुलंद आवाज, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. भावपूर्ण श्रद्धांजली !

- भाई जगताप

Pradip Bhide News
पाठिंबा हवा असेल तर संपर्क साधा, ओवैसींची महाविकास आघाडीला ऑफर

'आजच्या ठळक बातम्या' सांगणारा भारदस्त आवाज हरपला. ज्येष्ठ वृत्तनिवेदक व प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांच्या निधनाने दूरदर्शनचा चेहरा हरपला आहे. त्यांचा भारदस्त व संयमी आवाज सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली !

- हर्षवर्धन पाटील

ज्येष्ठ वृत्तनिवेदक व प्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. प्रदीप भिडे यांच्या निधनाने दूरदर्शनचा चेहरा हरपला आहे. त्यांचा भारदस्त, संयमी आवाज आणि प्रसन्न मुद्रा मराठी माणसांच्या सदैव स्मरणात राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली !

- धीरज देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.