मराठा आरक्षण: '५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी'

Ashok Chavan-Maratha-Reservation
Ashok Chavan-Maratha-ReservationE-Sakal
Updated on

मुंबई: केंद्रीय मंत्रीमंडळाकडून १०२ व्या घटनादुरुस्तीला मंजूरी मिळाली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. मात्र, याबाबत आता राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचं म्हटलंय. अशोक चव्हाण यांनी म्हटलंय की, १०२ व्या घटनादुरुस्तीचं स्वागतच आहे. त्यातून राज्याला अधिकार मिळतीलही मात्र, त्यातून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. अधिकार दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि मार्ग मोकळा होईल, हा गैरसमज आहे.

Ashok Chavan-Maratha-Reservation
राहुल गांधींकडून पीडितांचा फोटो ट्विटरवर; NCPCR कडून कारवाईची मागणी

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय कॅबिनेटचा आजचा निर्णय हा अर्धवट आहे. कारण, आरक्षण मिळण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा जाणे गरजेचे आहे. ५० टक्के आरक्षणाची तरतुद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे वास्तव आहे. या घटनादुरुस्तीमुळे, आरक्षण देण्याबाबतचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे कदाचित असा गैरसमज निर्माण होऊ शकतो की, यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, तसं नाहीये. त्यासोबतच, इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्क्यांची मर्यादा काढली पाहिजे. तरच या अधिकारांचा उपयोग होईल. त्यामुळे घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करुन अर्धवट काम झालंय. राज्याच्या पारड्यात चेंडू टाकून केंद्र सरकार स्वत:चं अंग काढून घेतंय. मात्र, एवढ्यावर आरक्षण मिळणार नाहीये.

मागे चंद्रकांत पाटलांनी आरोप केला होता की, राज्य सरकार दिशाभूल करतंय मात्र, त्यांना माझा सवाल आहे, तेंव्हा मी चुकीचं वक्तव्य केलं असेल तर आज केंद्राला हा निर्णय का घ्यावा लागला, याचा उत्तर द्यावं. ५० टक्के कायम ठेवून अधिकार दिल्याने काहीच होणार नाही तसेच राज्यांना काही करताही येणार नाही.

Ashok Chavan-Maratha-Reservation
विरार : इमारतीवरून फेकलेल्या नवजात बाळाच्या हत्येचा खुलासा

यामागे भाजपचं राजकारण

ते पुढे म्हणाले की, घटनादुरुस्तीसोबतच केंद्राला ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय देखील एकत्रितपणे घेता आला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही, यामागे भाजपचं राजकारण आहे, हे स्पष्टच होतंय. फक्त मराठा आरक्षणच नव्हे तर इतर राज्यांतील आरक्षणामध्येही हीच ५० टक्क्यांच्या मर्यादेची अडचण आहे. केंद्र सरकार राज्यांवर खापर फोडू इच्छित आहे. मात्र, माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी ५० टक्क्यांची मर्यादा काढावी, आम्ही श्रेय तुम्हालाच देऊ. आमची काही अडचण नाही. मात्र, समाजाची दिशाभूल करु नका. यातून काही मार्ग निघणार नाही. असं करु नका, असं आवाहनही त्यांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.