''देवीच्या मंडपात शब्द देतो, मराठा समाजाला...'' जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद

Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on

ठाणेः मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली वेळ २४ तारखेला संपत असल्याने २५ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसत असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. केवळ अंतरवालीच नाही तर राज्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरु होईल आणि हे आंदोलन पुढे आमरण उपोषणापर्यंत जाईल, असं जरांगेंनी सांगितलं.

यासह अंतरवाली गावात कोणत्यात आमदार, खासदार आणि मंत्र्याला पाय ठेवू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २५ तारखेपासून आपण पाणी आणि औषधही घेणार नाही, असं म्हणत सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगेंनी केलीय.

Maratha Reservation
Sharad Pawar Live : शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; अजित पवार काकांच्या जवळ गेले पण...

ठाण्यातील देवीच्या आरतीसाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन केलं आहे. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या, हे अत्यंत वेदनादायी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत त्यावर काम सुरु आहे. शिवाय आम्ही क्युरेटिव्ह पीटीशन दाखल केली आहे, सुदैवाने कोर्टाने दाखल करुन घेतलीय.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला देण्यासंदर्भात जुन्या नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेंची कमिटी स्थापन केली असून त्यांना पाच ते सहा हजार जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत. आजही त्याच्यावर काम सुरु आहे. मराठा समाजाली तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, थोडा धीर धरा सरकारला वेळ द्या.

Maratha Reservation
Ajit Pawar : ''शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा, हे आमचं ब्रीदवाक्य'', शरद पवारांसमोर अजित पवार नेमकं काय बोलले?

''सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात मराठवाड्यात कॅम्प घेण्यात येणार आहेत. मी मराठा समाजाचा आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला मागण्यांची जाणीव आहे. मी कधीही खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळणारा मी माणूस आहे.. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ते देण्यात येईल. दुसऱ्या समाजावरही अन्याय होणार नाही''

मुख्यमंत्री बोलले की, मराठा समाजाला सरकार काय देतं, याचा उल्लेख आजच्या जाहिरातीलमध्ये केला आहे. साडेआठ टक्के आरक्षण मराठा समाजाचे तरुण घेतात, हे चांगलं आहे. आज मी देवीच्या मंडपात शब्द देतोय, खोटं बोलणार नाही.. मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.