Maratha Reservation: अनोळखी फोन कॉल उचलू नका; अजित पवार गटाच्या बैठकीत आमदार-खासदारांना सूचना

Maratha Reservation: अनोळखी फोन कॉल उचलू नका; अजित पवार गटाच्या बैठकीत आमदार-खासदारांना सूचना
Updated on

मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अजित पवार गटाची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार-खासदारांना अनोळखी फोन कॉल न उचलण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. मराठा आंदोलनावरुन निर्माण झालेली स्थिती पाहता अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितलं. देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत विधानसभा-विधानपरिषदेतील आमदार आणि मंत्री उपस्थित होते. (Maratha Reservation andolan Do not Pick Up Stranger Phone Calls Instructions to MLAs in Ajit Pawar group meeting)

Maratha Reservation: अनोळखी फोन कॉल उचलू नका; अजित पवार गटाच्या बैठकीत आमदार-खासदारांना सूचना
शिंदे गटाचे २ तर काँग्रेसचा १, पाहा मराठा आरक्षणासाठी कोणी केला आमदारकीचा त्याग! वाचा संपूर्ण यादी...

सुनिल तटकरे यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्व नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. यावेळी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा असा एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी ठेवली जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे आमदार-खासदार आणि मंत्री यांना अनोखळी क्रमांकावर आलेले फोन कॉल न घेण्यास सांगण्यात आलं आहे. सामाजिक शांतता भंग करण्याचा हा डाव असू शकतो, असं त्यांना सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासोबत एका मराठा आंदोलकाचा फोन कॉल व्हायरल झाला होता. त्यानंतर सोळंके यांचे घर जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.