बीड- मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तरुणाने काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आज त्याने आत्महत्या केली आहे. स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. जगन्नाथ काळकुटे असं जीवन संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
जगन्नाथ काळकुटे याने शुक्रवारी झाडावर चढून आंदोलन केलं होतं. त्याने झाडाला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढली होती. त्यानंतर तरुणाने आंदोलन मागे घेतले होते. आज तरुणाने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुनिल कावळे या तरुणाने उड्डाणपुलाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सुनिल कावळे याच्या बॅगमध्ये चिठ्ठी सापडली होती. यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितलं होतं. आज याच मुद्द्यावरुन आणखी एक आत्महत्या झाली असल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा उग्र होत असल्याचं हे चिन्ह आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्याआधीच या आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, नाही दिले तर आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ असं ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.