Maratha Reservation : समाजाचं भल करायचं तर काही गोष्टी ऐकाव्या; जरांगे पाटलांवर खोतकर यांची नाराजी

Arjun Khotkar
Arjun Khotkar
Updated on

जालना - जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. पोलिसांकडून कऱण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन चिघळलं होतं. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्री उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Arjun Khotkar
Maratha Andolan : मोठी बातमी ! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुत्रांची माहिती

या पार्श्वभूमीवर जालन्यातील शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अखेरपर्यंत जीआरवर ठाम आहेत. यावरून माजी मंत्री खोतकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

Arjun Khotkar
Maratha Andolan : अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना जरांगे यांच्या भेटीला; दिलं महत्त्वपूर्ण आश्वासन

अर्जुन खोतकर म्हणाले की, आम्ही सकाळपासून आंदोलकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गेलो होतो. शिष्टमंडळही होतं. मात्र आज मी खूप दु:खी आहे. हे आंदोलन मार्गी लागू शकल नाही. तांत्रिक बाबी पूर्ण कऱण्यासाठी मुख्यमंत्र्या एक महिन्यांचा कालावधी मागितला. ३० दिवसांच्या पुढे एकही दिवस घेणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी ऐकायला पाहिजे होतं आणि मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता.

दरम्यान समाजाचं भल करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाजारांनी आपल्या कारकिर्दीत अनेकदा तह केला. चार पावले मागे आले आणि २५ पावले पुढं गेले. असचं यश जरांगे पाटलांना मिळवता आलं असतं. अजुनही चर्चेची दारे उघडी आहेत, असंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.