Maratha Reservation Video : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; मराठा आंदोलकांनी केला थेट सवाल

Maratha Reservation Video : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; मराठा आंदोलकांनी केला थेट सवाल
Updated on

नांदेडः राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनं जोर धरु लागली आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव घालण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज घेराव घालण्यात आला. नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत 'मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं?' असे प्रश्न उपस्थित केले. यावेळी उपस्थितांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा दिल्या.

Maratha Reservation Video : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; मराठा आंदोलकांनी केला थेट सवाल
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांचा भावी 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! स्वराज्यची राजकीय योजना काय?

१ सप्टेंबर रोजी जालन्याच्या आंतरवालीमध्ये पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. त्यानंतर राज्यभर मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील मागच्या अकरा दिवसांपासून आंतरवालीमध्ये उपोषण करीत आहेत. सरकारने अद्याप अपेक्षित तोडगा काढला नसल्याने त्यांचं उपोषण सुरुच आहे.

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने एक जीआर काढून मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समिती स्थापन केली. मात्र निजामकालीन नोंदी असतील तरच प्रमाणपत्र देता येईल, अशी अटकळ आहे. तोच मुद्दा वगळावा, अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरलेली आहे.

Maratha Reservation Video : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; मराठा आंदोलकांनी केला थेट सवाल
Maratha Reservation : जालना लाठीहल्ला प्रकरणी मोठी अपडेट! हायकोर्टात जनहित याचिका दाखल

जालन्यातील आंदोलन चिघळल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये उपोषणं, मोर्चे आणि धरणे आंदोलनं सुरु आहेत. सुरुवातीला काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. आता शांततेच्या मार्गाने आंदोलनं सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()