Maratha Reservation : हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल होणार; जाळपोळीच्या घटना दु्र्दैवी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘‘मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

मुंबई - गेले काही दिवस शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागले असून बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाळपोळ झाली.आमदार, लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. या घटनांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध थेट हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखले केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

‘‘मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरक्षणासंदर्भात आश्वासन दिले आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे वचनबद्ध आहे. मात्र असे असतानाही जाळपोळीच्या घटना घडणे हे दुर्दैवी आहे,’’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, की ‘‘यासंदर्भातील मंत्रिमंडळातील निर्णयही मंत्र्यांनी सांगितले आहेत. पण, याचवेळी काहीजण या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषतः ज्या प्रकारे सोमवारी (ता.३०) काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरे जाळली. काही विशिष्ट समाजाच्या लोकांना लक्ष्य करत त्यांचे हॉटेल,

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिर्डीत कडकडीत बंद

दवाखाने जाळले हे अत्यंत चुकीचे आहे. या सर्व घटनांची राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने दाखल घेतली असून या सगळ्यांवर पोलिस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. विशेषतः लोक घरात असताना घरे जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचे सगळे व्हिडिओ, फुटेजस् मिळालेले आहेत. ५०-५५ लोकांची ओळखही पटली आहे. उरलेल्यांची ओळख पटविली जात आहे.’’

Maratha Reservation
Maratha Reservation: येवल्यात अन्नत्याग आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

‘‘ज्या ठिकाणी शांततापूर्ण आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. त्यांचे म्हणणं ऐकून घेतले जाईल. मात्र, हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. आवश्यकतेप्रमाणे अधिक बळ तैनात करण्यात आले आहे. जोपर्यंत शांतता होत नाही आणि अशा विघातक शक्तींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील. त्याचप्रमाणे या जाळपोळीच्या घटना घडत असताना दुर्दैवाने काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील यात सामील असल्याचे लक्षात आले आहे. त्यांची खात्री झाल्यानंतर याची माहिती माध्यमांना दिली जाईल,’’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिर्डीत कडकडीत बंद

या सगळ्या लोकांवर पोलिस कलम ३०७ च्या अंतर्गत म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अंतर्गत कारवाई करणार आहेत. अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कुणाची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न होणार असेल, तर सरकार आणि पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.