Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदेंना दुसरा धक्का! आणखी एका खासदाराने दिला राजीनामा

Maratha Reservation:
Maratha Reservation:
Updated on

नाशिक- खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाच्या आणखी एका खासदाराने राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला राजीनाम्याबाबत कळवलं आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता राजीनामा देत असल्याचं हेमंत गोडसे म्हणाले आहेत.

राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने मराठा समाज नाराज असल्याची भावना असल्याचं म्हणत शिंदे गटाच्या आतापर्यंत दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष नसल्याने त्यांनी कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे ओम बिर्ला त्यांचा राजीनामा स्वीकारतात का? हे पाहावं लागेल.

Maratha Reservation:
Maratha Reservation: मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका; सुनील तटकरेंचे आवाहन!

हेमंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे राजीनामा दिला आहे. राज्यात मराठा समाजाचा मुद्दा पेटलेला असताना मला पदावर रहायचा अधिकार नाही. जरांगे पाटील यांची तब्बेत खालावत आहे. पण ते मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री यांनी उद्या बैठक बोलवली आहे. त्यांचाही प्रयत्न आहे आरक्षण द्यावं. त्यांनी तर शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे.

माझा निर्णय भावनिक नाही. मी विचारपूर्वक राजीनामा दिला आहे. मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला स्टंट करण्याची गरज नाही. ज्यांना या २०-२५ वर्ष खासदार राहायचा अनुभव आहे ते स्टंट करत असतील, असं हेमंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. एवढ्याच भावना असतील तर तुम्ही का राजीनामा दिला नाही ? असा सवाल त्यांनी केला.

Maratha Reservation:
Maratha Reservation: उद्यापासून प्रमाणपत्र वाटपास सुरुवात? मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय! CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. विशेषत: बीडमध्ये आंदोलन उग्र बनलं आहे. सरकारने जवळपास साडे अकरा हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी केलीये. पण, तुर्तास आंदोलन थांबण्याची चिन्ह नाहीत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.