Maratha Reservation: CM शिंदे, अजित पवार अन् चंद्रकांत पाटील जरांगेंना भेटणार; हालचालींना वेग

प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Eknath Shinde_Ajit Pawar_Chandrakant Patil_Manoj Jarange
Eknath Shinde_Ajit Pawar_Chandrakant Patil_Manoj Jarange
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषय उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज संध्याकाळी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळातील या तीन बड्या मराठा मंत्र्यांच्या समजुतीनंतर तरी जरांगे उपोषण मागे घेतात का? हे पहावं लागणार आहे. (Maratha Reservation CM Eknath Shinde DCM Ajit Pawar Chandrakant Patil will meet Manoj Jarange today evening)

Eknath Shinde_Ajit Pawar_Chandrakant Patil_Manoj Jarange
India Vs Pakistan Cricket Match: क्रिकेट सामन्यासाठी भारताच्या दोन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर? जाणून घ्या तारखा

संध्याकाळी ५ वाजता देणार भेट

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात जाऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रयत्न करणार आहेत. चंद्रकात पाटील यांनी यासाठी आपली एक बैठकही रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde_Ajit Pawar_Chandrakant Patil_Manoj Jarange
Mexico Aliens : मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी समोर आणले एलियन्सचे मृतदेह? व्हिडिओ होतोय व्हायरल

जरांगेंना कल्पनाच नाही

दरम्यान, जरांगे यांना हे तीन मराठा नेते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत याची कल्पना देण्यात आलेली नाही. माध्यमांनी विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मला अधिकृत कोणाचाही फोन आला नाही उलट मीडियाच्या माध्यमातूनच मला ही माहिती मिळते आहे. पण त्यांना जर समाजाला संबोधन करायचं असेल त्यासाठी जर ते भेटीसाठी येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Eknath Shinde_Ajit Pawar_Chandrakant Patil_Manoj Jarange
Kareena Kapoor Khan : करिना कपूर रिटायरमेंट घेणार? काय दिलं बेबोनं उत्तर

उपोषणाचा १५ वा दिवस

दरम्यान, मंगळवार मंत्री उदय सामंत, संदिपान भुंमरे, आमदार राजेश टोपे, अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. या ठिकाणी चर्चेदरम्यान मार्ग निघेल असं वाटत होतं, पण मुख्यमंत्र्यांनी इथं यावं असं जरांगे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री शिंदे हे इथं आल्यावरच उपोषणाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असं जरांगे यांनी बुधवार अंतरवाली सराटी इथं सांगितलं होतं. जरांगे यांचा उपोषणाचा आजचा 15वा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.