Chhagan Bhujbal : ''एक गाढव टाकीवर चढून बसलंय...'' भुजबळांचा तोल ढासळला, जरांगेंवर खालच्या भाषेत टीका

Chhagan Bhujbal on manoj jarange patil
Chhagan Bhujbal on manoj jarange patilesakal
Updated on

इंदापूरः मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली आहे. जरांगेंना गाढवाची उपमा देत भुजबळांनी टीकास्र डागलं.

छगन भुजबळ म्हणाले की, 1985 साली मी मुंबईला महापौर आणि आमदार झालो होतो. तेव्हा यांचा (मनोज जरांगेंचा) जन्म झाला होता की नाही माहिती नाही. मला तो येवल्याचं येडपट म्हणतो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव.. डोक्यात हवा गेलीय.

भुजबळ एक उदाहरण देताना बोलले की, गावात पाण्याची टाकी असते.. पाच-सहा माळे उंच असते. एके दिवशी सकाळी टाकीजवळ पोरं जमली होती. एक वयस्कर बाबा आले आणि म्हणाले इथं काय करताय? तिथली पोरं म्हटली, टाकीवर गाढव चढलं आहे, ते गाढव खाली कसं काढायचं, यावर विचार सुरुय.

त्यावर ते बाबा म्हणाले, त्याला खाली काढायचं बघू पण गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले आहेत, याला खाली कसं काढायचं?

असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीकास्र सोडलं. भुजबळांच्या वयावरुन जरांगेंनी केलेल्या टीकेला त्यांनी अशाप्रकारे उत्तर दिलं.

Chhagan Bhujbal on manoj jarange patil
Ajit Pawar: साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा अजितदादा, फडणवीसांना टोला

भाषणात भुजबळ काय म्हणाले?

आता त्यांचं चाललंय काय? गावबंदी..गावबंदी. मी कुठेही गेलो तरी गावबंदी. घनसावंगी गावात दोन फ्लेक्स लावले होते. एक मराठा आरक्षण गावबंदीचं. दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता.. आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताचं बॅनर होतं. बाकिच्यांना गावबंदी आणि पवारांचं स्वागत.. तिथे पवारांनी भाषण केलं. परंतु गावातल्या पोराने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Chhagan Bhujbal on manoj jarange patil
Vijay Wadettiwar : मंजूर झालेली विधेयकं तरुणांना देशोधडीला लावणारी!, विजय वडेट्टीवारांनी काढले सरकारचे वाभाडे

एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी? घटनेच्या १९व्या कलमानुसार कोणी कुणाला अडवू शकत नाही. कोणी कुठेही जावू शकतो. त्याला कुणी अडवलं तर एक महिन्याची सक्त मजुरीची सजा आहे. बोर्ड निघत नाहीत मात्र ठाराविक लोकांचं स्वागत केलं जातं, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवरही टीका केली आणि गावबंदी सिलेक्टिव्ह असल्याचं विधान केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.