Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि तानाजी सावंतांमध्ये जुंपली!

tanaji Sawant vs jarange patil
tanaji Sawant vs jarange patil sakal
Updated on

- शिवाजी भोसले

बेधडक अन् स्फोटक वक्तव्यांसाठी मंत्री प्रा. तानाजी सावंत हे प्रसिद्ध. मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्यावर सावंत यांनी जणू सुतळी बॉम्ब फोडले. त्यावर संवेदनशील मनोज जरांगे- पाटील यांनी मंत्री सावंत यांना शिंगावर घेत त्यांच्याविरुद्ध उखळी बॉम्ब फोडले, ज्याच्या ठिकर्‍या महाराष्ट्रभर पसरल्या.

जरांगे-पाटील विरुद्ध सांवत असा खडाखडीचा सामना रंगलाय. त्यातून सावंत हे मराठ्यांच्या हिटलिस्टवर येण्याची शक्यता निर्माण झाली. दोघांमधील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मराठे नेटकरी या संवादावर अक्षरश: तुटून पडताहेत. सावंत आणि जरांगे-पाटील यांच्यामधील जशास तसा संवाद... रंगलेला कलगीतुरा खास लाडक्या ‘सकाळ’च्या वाचकांसाठी

tanaji Sawant vs jarange patil
Maratha Reservation: मराठ्यांच्या कुणबी नोंदी आता मिळणार वेबसाईटवर; सरकारचा नवा प्रयत्न!

-सावंत : मराठा आरक्षण कधी मिळेल, हे सांगायला जर-तरच्या गोष्टी करायला मी काय ज्योतिषी नाही. मी काय पंचांग घेऊन बसलेलो नाही... -जरांगे-पाटील : आरक्षण कधी द्यायचं, कसं द्यायचं ते सरकारला कळतं. तुम्ही काय ज्ञान पाजळायची गरज नाही. -सावंत : यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण तत्कालीन सरकारला का टिकवता आलं नाही? ठाकरेंच्या काळातील आरक्षण का गेलं? हा माझा प्रश्‍न आहे. -जरांगे-पाटील : शायनिंग दाखवायची कशाला? श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची... ती शायनिंग तुमच्यापाशीच ठेवायची... मस्ती तिकडंच दाखवायची... आरक्षण का टिकलं नाही, हे बघावं... सांगावं जरा समाजाला... मस्तीतल्या गप्पा हाणायच्या उगीच... - सावंत : दिलेलं आरक्षण कायद्याच्या चाकोरीमध्ये टिकलं पाहिजे... - जरांगे-पाटील : आरक्षण टिकतं का नाही, ते द्यायचं की नाही हे सरकारला कळतं आणि ते घ्यायचं का नाही, हे मराठ्यांना कळतं.

tanaji Sawant vs jarange patil
Maratha Reservation : तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात, उडी मारायचा विचार आहे का? जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

-सावंत : दोन वर्षे आरक्षणावर कोणीच काय बोललं नाही... आताच आरक्षणाचं वादळ का उठलं? वादळ कोण उठवतेय?

-जरांगे-पाटील : त्यांना काय वादळ दिसलं हे माहीत नाही. परंतु, मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतेय हे खरं हाय. त्याला जर हे वादळ समजत असतील, त्याच्याबद्दल ते जर असं बोलत असतील तर ही मात्र मोठी शोकांतिका आहे मराठा समाजाची...

सावंत: आरक्षणाच्या मुद्यावर 2024 मध्ये राजीनामा देण्याचं बघू या... बघू ना... 31 डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम आहे बघू... आमचे राजे आहेत... छत्रपती आहेत... माझा मराठा समाज आहे. यांच्या माध्यमातून बघू ना... योग्य त्या वेळी, योग्य ती भूमिका घेऊ...

-जरांगे-पाटील : काय असतं... गोरगरिबांची टिंगल टवाळी उडविणार ना हे लोक... पैसा खूप आहे ना... पैसा खूप आहे... मराठ्यांच्या जिवावर सगळ्या गोष्टी मिळाल्यात ना यांना... पोट वाढलं ना ह्यांचं... त्याच्यामुळं काय आता? भरून पुरले ना... यांना भरपूर आहे... त्यामुळे ती मस्ती आहे, ती पैशाची... श्रीमंतीची...

tanaji Sawant vs jarange patil
Maratha Reservation: जिल्ह्यात 76 हजार कुणबी नोंदी; तपासणी मोहिमेत 39 लाख कागदपत्रांची पाहणी

करायला गेलं एक अन् झालं दुसरंच...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या 35 कुटुंबांचं पालकत्व मंत्री सावंत यांनी घेतलं. त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदतही केली. कार्यक्रमानंतरच्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी मराठा आरक्षणावर सुतळी बॉम्ब फोडले आणि ते वादात सापडले. करायला गेले एक अन् झालं दुसरंच, असे ते झालं.

काही लक्ष्यवेधी

-जरांगे-पाटील भडकले सावंतांवर

-मस्ती नका दाखवू, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? जरांगे-पाटलांचा सावंतांना सवाल

- ठाकरेंच्या काळातील आरक्षणाचं सांगता? तेव्हा तुम्ही कोठे होता, जरांगे-पाटलांचा सावंताना प्रश्‍न

- सावंताच्या वक्तव्यावर जरांगे-पाटलांचा पलटवार

- सावंतांच्या वक्तव्यावरून मराठा आरक्षणाच्या वादाला फोडणी

tanaji Sawant vs jarange patil
Maratha Reservation: मराठ्यांच्या कुणबी नोंदी आता मिळणार वेबसाईटवर; सरकारचा नवा प्रयत्न!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.