Maratha Reservation : आता कुणबी मराठा दाखला मिळणार, पण हवा 'हा' पुरावा; 'असे' मिळवा Caste Certificate

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर कुणबी मराठा दाखल्याचा विषय चर्चेत आला आहे.
Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificateesakal
Updated on
Summary

आता जिल्ह्यातील मराठा समाजापुढे आपल्याला कुणबी दाखला कसा मिळेल, हा प्रश्न उभा राहिला आहे.

सातारा : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनानंतर (Jalna Maratha Andolan) कुणबी मराठा दाखल्याचा (Kunbi Maratha Caste Certificate) विषय चर्चेत आला आहे. हा दाखला सातारा जिल्ह्यात मिळणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुळात हा दाखला सर्व तालुक्यात दिला जातो.

Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Bhokardan Bandh : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; कारनंतर आता भररस्त्यात स्वत:ची दुचाकी जाळत सरकारला दिला इशारा

पण, त्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा सादर करावा लागत आहे. हा पुरावा जिल्ह्यातील काही तालुक्यांतच मिळतो. त्यामुळे आता कुणबी मराठा दाखल्याबाबत निर्णय घेताना शासन निर्णयात काय जाहीर करणार? त्यावर या दाखल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी असे दाखले मिळतात. त्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातही असे दाखले असलेले अनेक लोकप्रतिनिधी, काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकही आहेत. जालना येथील आंदोलनानंतर कुणबी दाखल्याचा विषय चर्चेत आला.

Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Hasan Mushrif : मराठा आरक्षण रद्द होण्यामागची खरी कारणं लोकांना माहिती आहेत; हसन मुश्रीफांचा कोणावर निशाणा?

तेथील मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जाणार आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात ही कुणबी दाखले मिळणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या माण, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण, वाई तालुक्यांत काही जणांकडे मराठा कुणबी दाखले आहेत. काही लोकप्रतिनिधींकडेही हे दाखले असून, मतदारसंघात ओबीसी आरक्षण लागल्यास त्याचा वापर केला जात आहे.

आता जिल्ह्यातील मराठा समाजापुढे आपल्याला कुणबी दाखला कसा मिळेल, हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी १९६७ किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा आवश्यक आहे. हा पुरावा मिळविणे सोपे नाही.

त्यासाठी शासनाने निर्णय घेताना सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. याबाबतचे त्या त्या तालुक्यात असलेल्या जुन्या नोंदी असलेली कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठा समन्वयकांनी शासनाकडे तशी मागणी करून त्याची अंमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे.

Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Jalna Maratha Andolan : बार असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! मराठा आंदोलकांवरील खटले लढणार विनामोबदला, आंदोलनालाही दिला पाठिंबा

असा मिळवा दाखला...

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक (तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या.

तसेच खापर पणजोबांचे चुलते/आत्या आदी.) यापैकी कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पुढीलपैकी पर्याय तपासावेत.

अ) रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

ब) स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले.

Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Maratha Reservation वरून राजकारण करणाऱ्यांनी आरशासमोर उभं राहून..; शरद पवार, उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले उदयनराजे?

आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासावे.

क) आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी

(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

Maratha Reservation Kunbi Maratha Caste Certificate
Kolhapur Bandh : अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर कडकडीत बंद; तब्बल 300 कोटींची उलाढाल ठप्प, सर्व घटकांचा आंदोलनाला पाठिंबा

ड) रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

इ) रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()