Manoj Jarange : 'सोयरे' शब्दावरुन अडलं; मंत्री म्हणतात, शक्य नाही; जरांगे म्हणतात, शब्द दिलाय...

आई ओबीसी असेल तर मुलांनादेखील ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी मनोज जरांगे पटलांची मागणी आहे. पाटलांनी 'सोयरे' हा शब्द लावून धरत आम्हाला सरसकटला पर्यायी शब्द सोयरे दिला होता, असं म्हटलं आहे.
Manoj Jarange : 'सोयरे' शब्दावरुन अडलं; मंत्री म्हणतात, शक्य नाही; जरांगे म्हणतात, शब्द दिलाय...
Updated on

अंतरवाली सराटीः आई ओबीसी असेल तर मुलांनादेखील ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी मनोज जरांगे पटलांची मागणी आहे. शिवाय राज्य सरकारने सरसकट आरक्षणाची तारीख फेब्रुवारी महिन्यात नेवून ठेवीलय. त्यामुळे जरांगेंचं आंदोलन होणार, अशी शक्यता दिसून येतेय.

अंतरवाली सराटी येथे गुरुवारी सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भूमरे यांची उपस्थिती होती.

Manoj Jarange : 'सोयरे' शब्दावरुन अडलं; मंत्री म्हणतात, शक्य नाही; जरांगे म्हणतात, शब्द दिलाय...
WFI New Chief Elected: भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंहच्या खास व्यक्तीची निवड

मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुटलं त्यावेळी माजी न्यायमूर्ती गायकवाड आणि शुक्रे यांनी रक्ताचे नातेवाईक आणि सगेसोयरे यांना आरक्षण देता येईल, असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणेच आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सोयऱ्यांना आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसा कायदाच असून तो देशभर आहे. त्यामुळे आपल्याला आईप्रमाणे मुलांना ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नाही, असं महाजन म्हणाले.

Manoj Jarange : 'सोयरे' शब्दावरुन अडलं; मंत्री म्हणतात, शक्य नाही; जरांगे म्हणतात, शब्द दिलाय...
Share Market Closing: शेअर बाजार पुन्हा जोमात! गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा नफा

दुसरीकडे जरांगे पाटलांनी 'सोयरे' हा शब्द लावून धरत आम्हाला 'सरसकट' शब्दाला पर्यायी शब्द सगेसोयरे दिला होता, असं म्हटलं आहे. पुतण्याला आरक्षण मिळेल, हे मान्य. परंतु पुतण्या सोयरा होत नाही. मामा-भाचा, बायकोकडील नातेवाईक सोयर असतात; हे त्यांना माहिती नव्हतं का? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला. तुम्ही देश चालवता, तुम्हाला सोयरे कोण असतात आणि रक्ताचे नातेवाईक कोण असतात, हे माहिती नाही का? असाही थेट सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

पुढे बीडमधील मराठा आंदोलकांनी पोलिसांनी ज्या नोटिसा पाठवल्या आहेत, त्यावर जरांगेंनी प्रश्न उपस्थित केला. १२५ जणांना कशामुळे नोटिसा दिल्या? जे लोक २३ तारखेच्या सभेच्या कामात आहेत, त्यांना नोटिसा दिल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

ट्रॅक्टर चालकांना नोटिसा

वडिलांचीच जात मुलांना आणि चुलत भावांना लागेल, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी महाजनांनी मुंबईतील आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जरांगे म्हणाले की, आम्ही अद्याप आंदोलनाची दिशा जाहीर केलेली नाही. तरीदेखील अनेक ट्रॅक्टर चालकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.