Maratha Reservation: मराठ्यांच्या कुणबी नोंदी आता मिळणार वेबसाईटवर; सरकारचा नवा प्रयत्न!

Kunbi Maratha: आठ जिल्ह्यांमध्ये महिनाभरात ८० कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation Kunbi Modi Lipiesakal
Updated on

Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने निजामकालीन पुरावे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली असली तरी त्याला प्रतिसाद खूपच कमी मिळत आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या महिनाभरात केवळ ८० कुणबी प्रमाणपत्रांचेच वाटप होऊ शकले आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या यंत्रणेने संशोधन करून मिळवलेले पुरावे संकेतस्थळावर टाकण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु केले जाणार आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र घेण्यासाठी कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, याचा आढावा सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. त्यावेळी केवळ मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ७० ते ८० प्रमाणपत्रे दिली गेली असल्याचे दिसून आले.

त्यामुळेच मराठवाड्यातील मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र संकेतस्थळ येत्या आठवडाभरातच सुरु केले जाणार आहे. दिवाळीनिमित्त सुट्ट्या असल्या तरी हे संकेतस्थळ तातडीने सुरु करण्याचे आदेश विभागाने ‘एनआयसी’ला दिले आहेत. आपल्या कुटुंबाची ‘कुणबी’ अशी नोंद आहे का, हे तपासण्यासाठी नाव, गाव अशी किरकोळ माहिती टाकून नोंद तपासता येणार आहे.

कुणबी म्हणून नोंद असेल तर संबंधित पुराव्याच्या आधारे अर्ज करता येणार आहे. मराठवाड्यात नोंदणी तपासण्याचे काम सुरु असून आतापर्यंत २२, ९२९ नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातील नोंदणी तपासण्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून एक कोटी ९१ लाख नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation: “मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हस्तक्षेप कमी होणार
मराठवाड्यातील मराठा-कुणबी प्रमाणपत्राचे पुरावे उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ या आठवड्यात सुरु केले जाणार असले तरी, पुरावे संकेतस्थळावर टाकण्यासाठी काही दिवस अजून लागणार आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हे पुरावे अपलोड करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे सातबाराविषयीची माहिती किंवा शेतीच्या नोंदीची माहिती ऑनलाइन उपलब्ध होते; त्याच धर्तीवर हे काम करण्याची सूचना ‘एनआयसी’ला करण्यात आली आहे. अशा प्रकारे हे पुरावे उपलब्ध करून दिल्यास लोकांना त्यांची नोंद ‘कुणबी’ म्हणून आहे किंवा नाही हे स्वत: तपासता येणार आहे. सरकारी हस्तक्षेप देखील कमी होईल होणार असल्याने कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation: “मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हे पुरावे उपलब्ध होणार.


१) महसूली अभिलेख : खासरा पत्रक, कुळ नोंदवही


२) जन्म मृत्यू रजिस्टर अभिलेख


३) शैक्षणिक अभिलेख


४) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख


५) कारागृह विभागाचे अभिलेख


६) पोलिस विभागाचे अभिलेख

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation : तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात, उडी मारायचा विचार आहे का? जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

७) सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेख : खरेदीखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, मृत्यूपत्रक, तडजोडपत्रक

८) भूमी अभिलेख विभागाचे अभिलेख – पक्काबुक, शेतवारपत्रक, वसुली बुक

९) माजी सैनिकांच्या नोंदी

१०) जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडील अभिलेख

११) शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशीलाबाबतचे अभिलेख. १९६७ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी

१२) जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेख

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा: माजी मुख्यमंत्र्यांनी केली मागणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.