जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. आज सहाव्या दिवशी त्यांनी अन्नपाणी त्यागलं आहे. त्यामुळं त्यांची प्रकृती ढासाळायला सुरुवात झाली आहे.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सातत्यानं त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत. ताज्या माहितीनुसार, डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, जरांगे यांना उपचारांची खूपच गरज आहे. (Maratha Reservation Manoj Jarang needs lot of treatment doctor gave an update on his condition)
उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की, सध्या मनोज जरांगेंवर उपचारांची खूपच गरज आहे. कारण पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात अन्न नाही. त्यामुळं डिहायड्रेशन खूप झालंय, त्यांना खूपच विकनेस आला आहे. बीपी पण कमी झालेला असणार आणि शुगर पण. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्याचा त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. (Latest Marathi News)
दिवसभरात त्यांना आमचा प्रत्येक तासाला आग्रह आहे की, त्यांनी पाणी आणि ट्रिटमेंट घ्यावी. पण ते ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात पहिल्यांदा आरक्षण आणि नंतर ट्रिटमेंट, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. पण आरक्षण हाच आपल्या प्रकृतीवरचा उपचार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, जरांगे यांची प्रकृती ढासाळत चालल्यानं अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलनाचे समर्थक आंतरवालीत दाखल होत आहेत. अनेक आंदोलक आक्रोशही करत आहेत. पण जोपर्यंत माझ्या तोंडून शब्द निघत आहेत तोपर्यंत चर्चेसाठी या, असं आवाहनही जरांगे यांनी सरकारला केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.