Maratha Reservation : आंतरवालीच्या सभेचं फंडिंग विचारणारे देवेंद्र फडणवीसच; प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला मुद्दा

Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

मुंबईः मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने जरांगे पाटलांशी इमानदारीने बोलावं, नाहीतर उद्रेक होईल असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आंतरवालीच्या सभेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले होते. सभेसाठी ७ कोटी रुपये कुठून आले, अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यासंबंधी प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली.

Manoj Jarange
Ambedkar-Pawar Meeting : शरद पवार, प्रकाश आंबेडकरांची झाली भेट; 'इंडिया'त सामिल होण्याचा मार्ग मोकळा?

आंबेडकर म्हणाले की, गावात सभा होतेय म्हटल्यावर शेतकऱ्यांनी दीडशे एकर शेतातलं पीक काढून जागा दिली. त्यामुळे पैशांचा प्रश्न नाही. काही लोकांनी खाण्यापिण्याची सोय केली होती, परंतु त्याला अदृष्य शक्ती म्हणता येणार नाही. तो समाजातील घटकांचा उत्स्फुर्तपणा होता. मुळात छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनीच फंडिंगचा मुद्दा उपस्थित केला, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, असं खर्चाबद्दल हे लोक संशय घेत असतील तर त्यांचंही बाहेर काढायला समाज मागेपुढे बघणार नाही. सरकारने जरांगे पाटलांशी इमानदारीने बोलावं. दोन महिने द्या, चार महिने द्या... असं म्हणणं चुकीचं आहे.

Manoj Jarange
Nitin Gadkari : राजकारण ते आरक्षणाच्या मुद्द्यावर गडकरींची दिलखुसास मुलाखत; वाचा एका क्लीकवर

''गावपातळीवर मराठा समाजाची बिकट अवस्था आहे. हाताला काम नाही त्यामुळे लग्नही होत नाहीयेत. सरकारने आता फसवाफसवीचं राजकारण थांबवावं नाहीतर त्यांच्यावरच हे सगळं उलटेल'' अशी भीती प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा संपन्न झाला. शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होता. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.