Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन

मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या कार्याचं कौतुक केलं तसेच मराठा समाजानं शांततेनं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल आभार मानले. तसेच आपण दिलेला शब्द पाळतो, जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली, असं सांगितलं. (Maratha Reservation Manoj Jarange Eknath Shinde says has fulfil his given words)

Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन
Manoj Jarange : GR मिळाला पण गुलालाचा अपमान करु नका.. आंदोलन मागे घेतल्यावर जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांच मी अभिनंदन करतो. व्यासपीठावरुन मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की, सगळ्या जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडं लागलं होतं. (Latest Marathi News)

आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय शिस्तीनं हे आंदोलन आपण मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली केलं. कुठंही या आंदोलनाला गालबोट न लावता हे आंदोलन आपण यशस्वी केलं याबद्दल मी इतर तुमचे अभिनंदन करतो"

Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन
Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट

जरांगेंचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमच्यावर असलेलं प्रेम आम्ही पाहिलं. शेवटी मराठा समाज आपला न्याय हक्क मागताना इतर कोणालाही त्रास नको याची काळजी घेतली, यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोरगरीब मराठ्याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तो शब्द मी पूर्ण केला आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. (Marathi Tajya Batmya)

Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन
Maratha Andolan Victory: अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून CM शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला

आज आमच्या दिघे साहेबांची जयंती आहे, बाळासाहेबांची जयंती २३ तारखेला झाली. या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील आमच्या पाठीशी आहेत. जमलेल्या मराठा बांधव-भगिनींचं स्वागत करतो. अण्णाभाऊ पाटील यांच्या भूमीत हा ऐतिहासिक सोहळा साजरा होतो आहे, याचा आनंद आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()