Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतलं कोपर्डी पीडितेच्या समाधीचं दर्शन, आईने जरांगेंबद्दल व्यक्त केली होती खंत

मनोज जरांगे कर्जतच्या जवळ आले होते, तरीही त्यांनी पीडितेच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही, अशी खंत पीडितेच्या आईने व्यक्ती केली.
manoj jarange maratha reservation
manoj jarange maratha reservationesakal
Updated on

Kopardi Victim's Mother on Manoj Jarange:मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर सभांचं सत्र सुरु केलं आहे. मनोज जरांगे शनिवारी (२१ ऑक्टोबर) सोलापूरच्या अकलूजमध्ये सभा घेण्यासाठी आले होते. यावेळी कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या आईने माध्यमांकडे खंत व्यक्त केली आहे. मनोज जरांगे कर्जतच्या जवळ आले होते, तरीही त्यांनी पीडितेच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही, अशी खंत पीडितेच्या आईने व्यक्ती केली. त्यानंतर मनोज जरांगे हे कोपर्डीत दाखल झाले, त्यांनी पीडितेच्या समाधीचं दर्शन घेतलं.

मनोज जरांगेंबद्दल बोलताना कोपर्डी पीडितेच्या आई म्हणाल्या होत्या की,"मनोज जरांगे आमच्यापासून १०-१५ किलोमीटरपर्यंत असलेल्या कर्जतमध्ये आले. पण मुलीच्या समाधीच्या दर्शनाला ते आले नाही. आज अनेक ठिकाणाहून लोक समाधीच्या दर्शनासाठी येतात. पण जरांगे पाटील आले नाहीत, त्यांनी आमची विचारपूसही केली नाही. याची खंत वाटते."

यावेळी पीडितेच्या आईने मराठा आरक्षणाबाबतही आपलं मत स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आधी दिवसांची मुदत दिली होती, जी नंतर १० दिवस वाढवण्यात आली. ही मुदत २४ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यानंतर २५ तारखेपासून निर्भयाच्या समाधीपासून आपण आंदोलनाला सुरुवात करू, असं पीडितेच्या आई म्हणाल्या. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आंदोलनात पुढं काय करायच याबाबत एकत्र येऊन चर्चा करु, असं त्या म्हणाल्या.

मराठा आरक्षणासाला पाठिंबा देताना त्या म्हणाल्या की, "मी स्वत: मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरेन, फक्त मराठ्यांना एकत्र आले पाहिजे. " (Latest Marathi News)

manoj jarange maratha reservation
Maratha Reservation : ''मनोज जरांगेंच्या भूमिकेला माझा विरोध'', शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.