Maratha Reservation: 'आईला आरक्षण पण मुलाला नाही ही मोठी शोकांतिका...', सर्व सोयऱ्यांना आरक्षण देण्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange Esakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पुन्हा एकदा जरांगेंनी आज माध्यमांशी बोलताना देखील दिलेल्या तारखेनंतर आमचं आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं म्हटलं आहे.

जरांगे यांनी आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या, त्यावर त्यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, दोन दिवसात निर्णय झाला नाही तर पुढची दिशा ठरवणार आहे, सरकारचा नोटीस देण्यावर भर आहे, याआधी त्यांनी नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी हा प्रयोग करू नये.

Manoj Jarange
'कर्नाटकच्या राजकारणातही एकनाथ शिंदे-अजित पवार, त्यामुळं काहीही घडू शकतं'; माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

सरकारने दिलेला शब्द २४ डिसेंबरच्या आत पुर्ण करावा अशी अपेक्षा आहे. आता काहीही झालं तरी मराठा समाज आरक्षण घेणार आहे. या दोन दिवसात निर्णय आला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

आईची कुणबी जात मुलाला लावा यावर ते म्हणाले की, आईची जात लावा याचा अर्थ विदर्भात मराठवाड्याची नाती आहेत. मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रातही आहेत. ज्यावेळी तिकडची मुलगी सासरी येते त्यावेळी तिला तिकडं आरक्षण असतं पण, तिच्या मुलाला तेच आरक्षण मिळावं ही मागणी आहे. एका मुलाला आईला असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यापेक्षा रक्ताचं नातं कोणतं असू शकतं, असा सवाल यावेळी जरांगेंनी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange
Shetkari Bhavan: राज्यातील 116 बाजार समित्यांना मिळणार शेतकरी भवन; दीड कोटी रुपये निधीची तरतूद

सोयरे हा शब्द सरकारने लिहिलाय, सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकलं आहे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आम्ही मुंबईत जाणार असं कुठेही जाहीर केलं नाही. त्यांनाच वाटत आहे की, आम्ही मुंबईला यावं. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, असंही पुढे ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.