Maratha Reservation : भुजबळांच्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले निष्ठूर...

Maratha Reservation : भुजबळांच्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले निष्ठूर...
Updated on

छत्रपती संभाजी नगरः एका ओबीसी कार्यकर्त्यासोबत बोलताना छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भुजबळ ओबीसी आंदोलन उभं करण्यासंदर्भात बोलत असल्याचं दिसून येत आहे. त्याला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले छगन भुजबळ?

एका कार्यकर्त्याशी बोलताना छगन भुजबळ म्हणातात की, आता आपण आवाज उठवला पाहिजे. मी एकटा कुठपर्यंत लढणार... तालुका तालुक्यात गावा गावात त्यांचे बुलडोजर चालत आहेत. यात ओबीसी वाचणार नाही.. करेंगे या मरेंगे... हेच करायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय.. सगळं झालं त्यांचं.. मी उभा राहतोय.

Maratha Reservation : भुजबळांच्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले निष्ठूर...
Corona News: सहा महिन्यांनंतर कोरोनाने काढलं डोकं वर!

जरांगेंचं प्रत्युत्तर

व्हायरल ऑडिओ क्लिपवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य लढेंगे आणि जितेंगे आहे. महाराष्ट्रात शांततेत आंदोलनं सुरु आहे... बाकी प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा आहे. आम्ही अतिक्रमण केले नाही,आणखी लढाई सुरू आहे. आमचं घेतलं किंवा अतिक्रमण केलं असं नाहीये.. गरीब मराठ्यांच्या मुलांविषयी निष्ठूर राहणे योग्य नाही.

Maratha Reservation : भुजबळांच्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले निष्ठूर...
Medar Caste Reservation : ‘चुकून वगळलेल्या’ मेदार जातीला आरक्षण?

जरांगे पुढे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांचा कुणालाही पाठिंबा असतो, आम्हाला पण आहे. मी भुजबळांचं पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली नाही. या पाठीमागे राज्यात अशांतता पासरवायची असेल.आम्ही मराठे विचलित होणार नाहीत, मग कुणीही काहीही बोलू द्या. भुजबळ भेटायला आले नाहीत, द्या सोडून विषय. आम्ही बोलत नाही म्हणजे ते आरक्षणावर बोलत नाहीत म्हणून. आताही बोलू द्या त्यांना सोडत नाही. अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांना उत्तर दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.