Maratha Reservation : "मराठ्यांसाठी हा सुवर्णक्षण!"; अंतरवली येथील भव्य सभेपूर्वी मनोज जरांगेंचा एल्गार

आज मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी येथे भव्य सभा होणार आहे,
manoj jarange patil
manoj jarange patilEsakal
Updated on

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमिवर आज जालना येथील अंतरवली सराटी गावात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत. या जंगी संभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, "जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत, आजपासून सरकारच्या हातात १० दिवस आहेत. आज मिळेल त्या जागी मराठा समाज उभा राहणार आहे. राज्यातील मराठ्यांसाठी हा सुवर्णक्षण आहे. याला स्वतः साक्षीदार व्हायचं आहे. आज एकह मराठा घरी थांबणार नाही. सर्व मराठे अंतरवलीकडे निघणार आहेत."

मनोज जरांगे काय बोलणार?

"सरकारने आता भावनाशून्य होऊ नये. ही वेदना आणि त्रास सरकारने ओळखून सरकारने १० दिवसांत आरक्षण द्यावं. आम्ही ते मिळवणारच असेही मनोज जरांगे म्हणाले. मी सगळा उलगडा करणार आहे. मी माझ्या समाजासमोर वस्तुस्थिती मांडणार आहे. कारण माझा समाज माझा मायबाप आहे. ते ऐकण्यासाठीच आले आहेत आणि ते त्यानंतर शांततेत घरी जाणार आहेत", असेही जरांगे यावेळी म्हणाले.

"आम्ही ११०० एकरची पार्किंगची सुविधा केली आहे आणि १७० एकर रान वाढवलं आहे. कारण आमचा समाज घरात राहाणार नाहीये. त्याला साक्षिदार व्हायचं म्हणून आम्ही सर्व सोय केली आहे." असंही जरांगे म्हणाले.

manoj jarange patil
Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊ दुसरं विमान दिल्लीत दाखल! दोन लहान मुलांसह 235 जणांचा समावेश

गुणरत्न सदावर्ते आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, ते दोन्ही एकाच बाजारातील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलायचं नाही. ते काय आहेत सगळ्या राज्याला माहिती आहे. भुजबळ तर लहान मुलांप्रमाणे काहीही बोलत आहेत.त्यांच्या आणि वयाचा बहुतेक ताळमेळ बसत नाही. ते बरळत आहेत. एवढ्या मोठ्या माणसाने असं बोललं नाही पाहीजे. सामान्य शेतकऱ्यांच्या लेकरांवर तर बोलायलाच नाही पाहिजे. कोटी हे कसे असतात हे आम्हाला माहितीच नाही असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

manoj jarange patil
Israel-Hamas : गाझाला एक लाख इस्रायली सैनिकांचा वेढा; 'असं' होणार ग्राऊंड ऑपरेशन

राज्य सरकारने विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. येत्या ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास पुन्हा एकदा आपण बेमुदत उपोषण सुरू करणार, असेही त्यांना स्पष्ट केलं होतं.

दरम्यान आज अंतरवाली सराटी गावात होणाऱ्या या सभेसाठी १६० एकरावर मंडप उभारण्यात आला आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी एकूण ७ प्रवेशद्वार असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सभेच्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सोय तसेच फिरते दवाखाने, रुग्णवाहिकाही उपलब्ध असणार आहेत. सभेसाठी येणार्‍या मराठाबांधवांच्या तसेच इतर नियोजनासाठी ५ हजार स्वयंसेवक जातीने तैनात असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.