Manoj Jarange : ''...म्हणून मी जरांगेंना भेटायला आलो'' संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange : ''...म्हणून मी जरांगेंना भेटायला आलो'' संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
Updated on

छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगरमधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जरांगेंना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रुग्णालयात दाखल झाले होते.

भेटीनंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले की, पुढच्या लढ्यासाठी आणखी बळ यावं, यासाठी मी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांची रिकव्हरी चांगली असून लिव्हर आणि किडनीवरील सूज कमी झालेली आहे. तरीही लवकर डिस्चार्ज करण्याऐवजी जास्तीत जास्त दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी गर्दी करु नये. हॉस्पिटलमध्ये शिस्त पाळण्यात यावी. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, हीच माझीदेखील भूमिका असते. मी २००७पासून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मनोज जरांगेंच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटणार आहेत याचा आनंद आहे.

Manoj Jarange : ''...म्हणून मी जरांगेंना भेटायला आलो'' संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
Elvish Yadav : एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यावर कसा? विरोधकांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

''समाजासाठी जे लढा देतात, अशांना बळ देण्यासाठी उभं राहाणं हे आपलं काम आहे. मनोज जरांगेंचा सरकारवर दबाव आहेच आणि आणखी दबाव वाढवण्यासाठी मी इथं आलो आहे.'' अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

दरम्यान, शनिवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची आणखी एका शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री संदीपान भूमरे, अतुल सावे, मंगेश चिवटे यांनी सुधारित जीआर मनोज जरांगेंना सुपूर्द केला. या जीआरनुसार सरकार केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधणार आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीच्या कार्यकक्षा सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Manoj Jarange : ''...म्हणून मी जरांगेंना भेटायला आलो'' संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
Online Fraud:ऑनलाईन फ्रॉडमध्ये गेलेले पैसे मिळाले परत, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मिळाले ७ लाख ७५ हजार परत

दरम्यान, शुक्रवारी राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत कुणबी नोंदी शोधण्याकामी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे सूचित केले आहे. शिवाय सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधणयासाठी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.