Manoj Jarange: एका नेत्याच्या दबावाखाली अख्खं सरकार येतं आहे की काय? काय म्हणाले जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौरा करत आहेत.
manoj jarange patil
manoj jarange patilEsakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. काल (सोमवारी) धाराशिव येथे जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. त्यावेळी अचानक ते खाली बसले त्यामुळे गोंधळ उडाला. सततचा प्रवास, जाहीर सभा, दौरा यामुळे थकवा आल्याने जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी बोलताना नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं म्हटलं आहे.(Latest Marathi News)

प्रकृती ठिक नसली तरी, नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. स्वतःच्या लेकरांसाठी मराठा समाज एकत्र आला आला. एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतंय का? असा प्रश्न देखील यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. (Marathi Tajya Batmya)

ज्या समाजाला माय बाप मानलं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की, त्यांनी मला लेकरू मानलं आहे. आरक्षणासाठी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. एक जीव जाईल पण, 6 कोटी जीव वाचतील. लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

manoj jarange patil
Winter Session: राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकणार! शरद पवारांबरोबरच 'हे' नेते होणार सहभागी

मला समाजाचं प्रेम मिळालं, माझ्या वाट्याला हे भाग्य आलं आहे, त्यांच्यासाठी लढणं हे देखील माझं कर्तव्य आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. गरीब लेकरांनी आरक्षणासाठी मोठ्या वेदना सहन केल्या आहेत. एका टक्क्यावरून चांगले पद गेलेली मराठी समाजाची लेकरं आहेत. आता तो न्यायाचा दिवस जवळ आला आहे असं जरांगेंनी म्हटलं आहे.(Latest Maharashtra News)

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सरकारने ८ तारीख आरक्षणासाठी दिली होती, मात्र, पुढे त्यांना काय झालं माहिती नाही एका नेत्याचं ऐकून त्यांच्या दबावाखाली सरकार येतं आहे की काय म्हणून आमच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत की काय? असं ही जरांगेंनी म्हटलं आहे.

manoj jarange patil
Anand Nirgude Resigned : राज्य मागासवर्ग आयोगच्या अध्यक्षांचा राजीनामा! आयोग बरखास्त होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.