Manoj Jarange : अजित पवारांच्या दिल्लीवारीवर मनोज जरांगे बोलले; म्हणाले, त्यांची भेट राजकीय असेल तर...

manoj jarange
manoj jarangeesakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षण चळवळीचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथे उपचार सुरु आहेत. उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यानंतर ते अंतरवाली सराटीला जाणार आहेत.

शनिवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आजची तपासणी झाल्यानंतर उद्या सुट्टी करा असे डॉक्टरांना सांगितले आहे. त्यामुळे रविवारी अंतरवालीला जाणार आहे.

manoj jarange
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस; IMDचा इशारा

सरकारच्या शिष्टमंडळाबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, शिष्टमंडळाचं आम्हाला कळलं नाही,आज पाहू शिष्टमंडळ काय करते, नाहीतर पुढची भूमिका काय घ्यायची त्यावर विचार करु.

अजित पवार शुक्रवारी अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी अमित शाहांसोबत दीड तास चर्चा केली. मात्र भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी दिल्ली भेट असेल तर चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात ही भेट असेल तर चांगलंच आहे. मात्र त्यांच्या भेटीचं राजकीय असेल तर मध्ये पडायची गरज नाही.

manoj jarange
''उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ न देण्याचं कारस्थान, आता २१ डिसेंबरला...'', संजय राऊतांनी केली भूमिका जाहीर

काय म्हणाले जरांगे पाटील?

पक्षाच्या नेत्यांना मोठं मानून मुलांचे भविष्य धोक्यात घालू नका. मराठा समाजाचे लोक नेत्यांच्या फराळाला जात असतील तर त्यांना आरक्षणाबद्दल विचारा. नेत्यांच्या जेवणापेक्षा मुलांचे भविष्य महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()