Maratha Reservation : 30 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा; राज्य शासनाबद्दल व्यक्त केली नाराजी

manoj jarange
manoj jarangeEsakal
Updated on

वडीगोद्रीः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमचे शांततेत आंदोलन सुरू आहे. काही नेत्यांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. हे करण्यापेक्षा एकत्र येऊन मराठा समाजाला स्वतंत्र प्रर्वगात कसे आरक्षण देता येईल, याचा विचार व्हावा.. यासंदर्भात संवाद व्हावा यासाठी 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी (ता.अंबड जि.जालना) येथे राज्यस्तरीय मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, ही माहिती मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बुधवारी (ता.27) पत्रकार परिषदेतून दिली.

30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर दौरा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी जाहीर केलं. ते म्हणाले की, जनतेशी संवाद साधणे, आढावा घेणे, नागरीकांना शांततेचे आवहान करणे , आरक्षण जनजागृती करण्यासाठी राज्याचा दौरा आयोजित केला आहे. या दौर्याची सुरुवात अंतरवाली सराटी येथुन 30 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे. अंबड, घनसावंगी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, कळमनुरी, उमरखेड, परळी, अहमदपूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणी जात जनजागृती करण्यात येणार आहे.

manoj jarange
Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या बहिणीला भाऊ देणार मदतीचा हात; पंकजांबद्दल धनंजय मुंडे म्हणाले...

दरम्यान, 14 तारखेला जो मेळावा अंतरवाली सराटी येथे होणार आहे यासाठी तयारी केली जात आहे. शंभर एकर जमिनीवर मंडप, पार्किंग आदी व्यवस्था केली आहे. येथे मोठ्या प्रमाणात राज्यातील नागरीक उपस्थित राहणार आहेत. या दिवशी समाजबांधवांना तीस दिवसाच्या मुदतीमध्ये शासनाने काय निर्णय घेतले, समीतीने काय काम केले, शासन स्थरावर कोणते अध्यादेश निघाले याची माहिती देऊन जर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर पुढे काय भूमीका घायची याबाबत उपस्थित जनतेबरोबर चर्चा करण्यात येणार आहे.

manoj jarange
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये; बावनकुळेंचं आवाहन

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, याकरीता 2004 च्या शासकीय अध्यादेश मध्ये दुरूस्ती करा पुरावे सापडले नाही तर आरक्षण द्यायचे नाही का? अशी भूमिका सरकारची चुकीची आहे.सामाजिक स्थिती लक्षात घेऊन आरक्षण द्यावे , सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे या साठी वेगळा प्रर्वग तयार करावा असे जरांगे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, काही नेते हे आरक्षण मान्य नाही असे सांगतात. विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली. कडाडून विरोध करणे चुकीचे आहे. ओबीसी-मराठा वाद निर्माण केला जात आहे. याला जनता बळी पडणार नाही. ओबीसींना धक्का लागणार नाही, वाद होऊ देऊ नये..राजकीय प्रतिष्ठेसाठी पुढारी हे प्रयत्न करत आहेत. आरक्षणाबाबत शासन व समिती काहीच माहिती देत नाही, संपर्क करत नाही यांचे काय चालले हे कळत नसल्याची नाराजी मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.