Manoj Jarange: भुजबळांच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम २४ डिसेंबर रोजी संपणार आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम २४ डिसेंबर रोजी संपणार आहे. यापार्श्वभूमीवर अद्याप ठोस कृती सरकारनं केलेली दिसत नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

तसेच एका कोणाच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना लगावला आहे. (Maratha Reservation Manoj Jarange waring to Devendra Fadnavis says dont influence pressure of Chhagan Bhujbal)

Manoj Jarange
NIA Raids: कट उधळला! NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत; बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त

ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको म्हणून मनोज जरांगेंसमोर उभ्या ठाकलेल्या छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या तुतू-मैमै पहायला मिळत आहे. एकमेकांविरोधात आव्हान-प्रतिआव्हानं दिली जात आहेत. दरम्यान, जरांगेंनी आता थेट फडणवीसांना इशारा दिला आहे.

Manoj Jarange
Nawab Malik: 'मलिकांना सोबत नको' अजितदादांना पत्र लिहिणाऱ्या फडणवीसांना ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, तेव्हा नैतिकता...

जरांगे म्हणाले, बघू २४ डिसेंबपर्यंत सरकार काय करतंय? त्यानंतर महाराष्ट्र काय असतो आणि त्या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे लक्षात येईल. थोडं धीर धरा तुम्ही किती पलट्या मारत आहात, आरक्षणाचा विषय तुम्ही का घेत नाही. आमचं बारीक लक्ष आहे तुमच्याकडं तुम्ही काय करता आहात? तुम्ही काय करणार? आम्हाला आश्वासनं काय दिली? गुन्ह्यांच्याबाबत काय दिली? अटकेच्याबाबत काय दिलं? मराठा आरक्षणाबाबत काय आश्वासनं दिली? याकडं आमचं बारकाईनं लक्ष आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange
Mahua Moitra: खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का? कोर्टात जाऊ शकतात का?; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फडणवीस आपलं स्टेटमेंट बदलतील त्यांच्या मूळ भूमिकेवर शंभर टक्के येतील. त्यांनी एकट्याच्या दबावात येऊन जर आपलं स्टेटमेंट बदललं असेलं पण ते आपल्या मुळं भूमिकेवर येतील. नाही आले तर त्यांना परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. पण हे काय असेल ते तुम्हाला २४ डिसेंबरनंतर लक्षात येईल, अशा शब्दांत मनोज जरांगेनी अल्टिमेटम देताना फडणवीसांना इशारा दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.