जळगाव - मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. ते काही तुमच्या माझ्या चर्चेने सुटणार नाहीत. सर्वांना माहित आहे हा न्यायप्रविष्ठ विषय होता. हायकोर्टापर्यंत आपण आरक्षण टिकवले. मात्र मागच्या अडीच वर्षात ठाकरे सरकारने लक्ष दिलं नसल्याने हे आरक्षण गेलं. हा लोकसभेत, विधानसभेत सुटणारा विषय राहिलेला नाही, त्यात सर्व बाजू समजून घेऊन तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून यावर तोडगा काढू, असंही महाजन यांनी नमूद केलं.
दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांना बेछूट मारहाण करणे हे निषेधार्थ आहे. मात्र एसटी बसची जाळपोळ सरकारी मालमत्तेची तोडफोड करू नये. उद्या आमच्या मुलांना शाळेत जायचं आहे, महिलांना प्रवास करायचा आहे. शेवटी ती आपली संपत्ती आहे म्हणून कोणीही शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये.,
महाजन म्हणाले की, मागील चार-पाच दिवसापासून त्यांचे हे आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. अशाप्रकारे रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये. हे योग्य नसल्याने सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली जनतेचा रोष एवढा झाला होता की पोलिसांना लाटीमार करावा लागला. मात्र तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करू शकत नाही. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं महाजन यांनी आश्वासन दिलं.
दरम्यान उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात अनेक अशा घटना घडल्या. त्यावेळी त्यांनी आंदोलकांची साधी विचारपूसही केली नव्हती. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. मात्र त्यांना ते टिकवता आले नाही, असंही महाजन यांनी नमूद केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.