Maratha Reservation : मराठ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात! सोमवारी दिली ठाणे बंदची हाक

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मुंबई - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मागील १३ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांवर काही दिवसांपूर्वीच लाठीचार्ज झाला होता. या लाठीचार्जचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. याचं लोन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पोहोचले आहे.

Maratha Reservation
DSK Case: डी. एस.केंना मोठा धक्का! कंपनीच्या शेअरची किंमत होणार शून्य, गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार?

या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे. या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजासह सर्व पक्षीय बैठक पार पडली.

या बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत विविध राजकीय पक्षांशी संबंधित मराठा समाजाच्या संस्था आणि संघटनानी या बंदला पाठिंबा दर्शवल्याची माहिती सकल मराठा मोर्चाचे समन्वयकांनी दिली.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM शिंदेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातील असून या बंदकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाठीहल्लाप्रकरणी शिंदे सरकारने चौकशीचे आदेश दिले असून जबाबदार पोलिस अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. या लाठीचार्जपासून जालन्यातील आंदोलन राज्यभरात चर्चेत आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.