Maratha Reservation: मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण; बीड-कल्याण एसटी बसवर दगडफेक

बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागला आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागला आहे. रात्रीच बीड कोल्हापूर बस पेटवून दिले असताना आज पुन्हा एकदा बीड कल्याण बसवर तुफान दगडफेक करत एसटी बस फोडण्यात आली आहे. बीडच्या सराटा गाव परिसरात ही घटना घडली असून मराठा आंदोलक बस फोडून घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याने प्रशासनाची मात्र धावपळ होताना पाहायला मिळत आहे .

बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. आज सकाळी पुन्हा एकदा बीड पासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

Maratha Reservation
Maratha reservation: 'मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

उमरखेडमध्ये अज्ञातांनी बसला लावली आग

नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बसला आग लावली. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या आगीत बस जळून पूर्णत: खाक झाली.

या घटनेनंतर रात्री बस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा सकाळी बस चालू झाल्या. आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर दगडफेक करत या गाडीचं नुकसान केलं.

Maratha Reservation
Ajit Pawar News : अजित पवारांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना अनुपस्थितीचं कारण आलं समोर; प्रफुल्ल पटेलांनी केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.