Maratha Reservation: मराठा समाज पाकिस्तानी की अमेरिकन? सरकारवर बच्चू कडू संतापले

बच्चू कडू यांनी काल आंतरावली सराटी इथं मनोज जरांगे यांची भेट घेतली.
Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal
Updated on

जालना : मराठा समाज हा पाकिस्तानी आहे की अमेरिकन? असा सवाल प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेकडून सिंदखेड राजा शहरात रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल चढवला. (Maratha Reservation Maratha Society is from Pakistani or American Bachchu Kadu)

Bacchu Kadu
Arif Mohammed Khan: राज्यपालांचा मनमानी कारभार! केरळ सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, केले गंभीर आरोप

बच्चू कडूंनी जरांगेंची घेतली भेट

बच्चू कडू यांनी काल आंतरवली सराटी इथं मराठा आंदोलनाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली. पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. (Latest Marathi News)

Bacchu Kadu
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू; मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

मराठ्यांना वाळीत का टाकताय?

यावेळी कडू म्हणाले, "निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकल्यासारखं करतो. तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. आमचा वाटा जास्त आहे देशात ओबीसींच आरक्षण ५२ ते ५५ टक्क्यांवर जातं पण आपल्याला २७ टक्के आरक्षण मिळालं आहे. (Marathi Tajya Batmya)

Bacchu Kadu
MP Assembly Election 2023: गड कोण राखणार... ज्योतिरादित्य की दिग्विजय सिंह? भाजप अन् काँग्रेसमध्ये पराकोटीचा संघर्ष

ओबीसींना आरक्षण वाढून द्या

त्यामुळं ओबीसींना आरक्षण वाढवून द्यावं. त्यासाठी मदत करा किंवा त्यात अबकड अशी वर्गवारी करा. पण नाही म्हणणं हे चुकीचं आहे. मराठा कोण आहे? पाकिस्तानचा आहे की अमेरिकेचा आहे? मग यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.