''सरकारने स्पष्टपणे काय ते सांगावं, खेळ करु नये'', सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडत संभाजीराजे थेटच बोलले

maratha reservation
maratha reservation esakal
Updated on

मुंबईः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक सुरुय. या बैठकीतून बाहेर पडत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला असून, सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, खेळ करु नये असं म्हटलय.

बैठकीतून बाहेर आल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, माझा मुद्दा मांडून मी निघालो आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मागच्या 15-20 वर्षापासून आम्ही गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मागणी आम्ही करत आहोत.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या बसत असेल तर सरकारने ते द्यावं.. पण जर हे शक्य नसेल तर तसं स्पष्ट सांगावं, खेळ करू नये, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला.

maratha reservation
जिल्हा परिषद ‘सीईओं’च्या दालनाची तोडफोड करणाऱ्यांवर एकूण १२ कलमांन्वये गुन्हा! चौघांना अटक, तिघांचा शोध सुरु

काय म्हणाले संभाजीराजे?

न्यायिक पद्धतीने जर सरसकट आरक्षण देता येत असेल तर सरकारने द्यायला पाहिजे. पण केवळ मराठा समाजाला खूष करण्यासाठी निर्णय घेणार असाल आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणार नसेल तर चालणार नाही. जेव्हा 2021 ला न्यायालयाने आरक्षण रद्द केलं; तेव्हापासून मी पत्र लिहित आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवलं.

maratha reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील अनुपस्थित; 'हे' नेतेही गैरहजर

मागासवर्ग आयोग गठीत झालेला नाही. तुम्ही मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करायला पाहिजे, हे मी सरकारला सांगितलं. तसेच सर्वेक्षण पुन्हा एकदा करण्याची गरज असून मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. मुळात ही सर्वपक्षीय बैठक आधी का घेतली नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.