Maratha Reservation: मराठा समाजाचे 16 टक्के आरक्षण फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने घालवले," रोहित पवारांचा मोठा आरोप

Rohit Pawar vs Devendra Fadnavis: राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणांनी सरकारला जेरीस आणले आहे.
Rohit Pawar, Devendra Fadnav And Gunratna Sadavarte
Rohit Pawar, Devendra Fadnav And Gunratna SadavarteEsakal
Updated on

राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणांनी सरकारला जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून रमेश केरे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या थेट घरावर धडक देत आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करत आहेत.

आज केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलकांनी आज शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेले 16 टक्के आरक्षण उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यामुळे गेले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही मत व्यक्त केले. ते म्हणाले, "सरकार मराठा आणि ओबीसी नेत्यांना वेगवेगळे भेटते. त्यांच्याशी काय चर्चा केली याबाबत विरोधकांना विश्वासात घेत नाही."

Rohit Pawar, Devendra Fadnav And Gunratna Sadavarte
Sharad Pawar: "आम्ही सहकार्य करण्यास तयार पण..." मराठा आरक्षणावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका

रोहित पवार पुढे म्हणाले की, "आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. पण होते असे की, आरक्षण दिले जाते आणि तिथं सत्तेत जी लोकं आहेत जसे की देवेंद्र फडणवीस. त्यांचीच लोकं मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जातात. काँग्रेस-राष्ट्रवादीने 16 टक्के आरक्षण दिले होते. ते कोर्टात जात कुणी हाणून पाडले तर सदावर्तेंनी. सदावर्ते कोणाचे कार्यकर्ते आहेत तर देवेंद्र फडणवीस यांचे."

Rohit Pawar, Devendra Fadnav And Gunratna Sadavarte
Maharashtra BJP: भाजपमध्ये कोणाची विकेट पडणार? "अप्रिय निर्णयासाठी तयार राहा," पक्षश्रेष्ठींचा राज्यातील नेत्यांना इशारा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोचे अनावरण

दरम्यान पुणे रोहित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या शहरातील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे कार्यालय आधी गुहुंजे स्टेडियमवर होते. त्यामुळे कोणाला काही कमानिमित्त यायचे झाल्यास ते गैरसोयीचे ठरत होते. पण आता सामान्यांनाही सहजपणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात जाता येणार आहे.

यावेळी रोहित पवार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएनचा लोगो तोच आहे. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून त्याचे आज अनावरण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.