Manoj Jarange : मराठा आंदोलन 3 तारखेपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंची घोषणा; म्हणाले...

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्चपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्या बेबनाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्चपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्या बेबनाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

'राज्य सरकार सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही, उलट मला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान केलं जात आहे' असं म्हणत जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांच्यावर खालच्या भाषेत टिपण्णी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने जरांगेंची एसआयटी चौकशी लावली असून अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु केलीय. शिवाय संचारबंदीदेखील लागू केलीय.

या प्रकारानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्च २०२४ पर्यंत मराठा आरक्षण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे. मंगळवारी प्रशासनाकडून अंतरवाली सराटी येथील मंडप काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक झाले. त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडत अंतरवालीकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पुन्हा प्रशासनाने माघार घेत मंडप काढणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Manoj Jarange
Rohit Pawar On Ajit Pawar : आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी...; रोहित पवारांचा अजितदादांवर थेट आरोप

बुधावारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांचा द्वेष करताना दिसून येत आहे. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरु आहे. राज्य सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय. आता जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही. तुरुंगात तडफडून मृत्यू झाला तरी उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं.

जरांगे पुढे म्हणाले, मागील महिन्याभरापासून सरकारने कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप थांबवलेलं आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेत रास्ता रोको करत होतो परंतु आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आता आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

Manoj Jarange
Shahid Kapoor Interview: 'ही लोकं कुणालाही सहजासहजी स्विकारत नाहीत'! शाहिद कपूरनं सांगितलं बॉलीवूडमधलं 'ते' सत्य

''सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण ज्यांना हवंय त्यांनी घ्यावं. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे. इंग्रजांनीही कधी केली नसेल अशी दडपशाही सध्या सुरु आहे. मराठ्यांविषयी जातीय द्वेष केला जात आहे. इन्स्टाग्रामवर बंदुक दाखवलेला फोटो टाकणं.. यातलाच प्रकार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी आमरण उपोषण सुरुच राहणार समाजासाठी तडफडून मरायला तयार आहे.'' अशा शब्दांमध्ये जरांगेंनी सरकारचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.