जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा आक्रोश मोर्चाचं आंदोलन सुरु होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.
अंतरवाली सराटी तालुका अंबड येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलीस आले असता मंडपातील नागरिक व पोलीसांचा मोठा राडा झाला.
या दरम्यान बाचाबाची होऊन दगडफेक, लाठीचार्ज झाला. यामध्ये गावातील अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पोलीस देखील जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज शुक्रवारी तालुका १ रोजी गालबोट लागले.
अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलीस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.
या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर बीड , उप विभागीय पोलीस अधिकारी दराडे , उप विभागीय पोलीस अधिकारी मुकंद आघाव , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ , पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.