Maratha Reservation: EWS अंतर्गत बहुतांश नोकऱ्या अन् प्रवेश मराठ्यांना, मग वेगळा कोटा का?

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

Maratha Reservation: 10 टक्के EWS कोट्याखालील नोकऱ्या आणि शैक्षणिक जागा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहेत. मराठा आरक्षणावरील राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीला सादर केलेल्या आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा मराठा आरक्षण रद्द केले तेव्हा राज्य सरकारने मराठा समुदायाला EWS कोट्याचा लाभ घेण्याची सुविधा दिली.

2023 मध्ये CET द्वारे EWS कोट्यातील तब्बल 76.6 टक्के प्रवेश मराठा समाजातील होते. एकूण 11,302 प्रवेशांपैकी 8,664 मराठा समाजाचे होते आणि फक्त 2,638 इतर समाजातील होते. त्याचप्रमाणे, 2019 ते 2022 पर्यंत EWS मधून राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 84.3 टक्के मराठा समाजातील उमेदवारांना लाभ मिळाला. (Maratha Reservation News)

तसेच MPSC मार्फत 2019 ते 2022 दरम्यान EWS कोट्यातून द्वारे भरलेल्या 650 नोकऱ्यांपैकी 548 मराठा समाजातील होत्या तर 102 इतर समाजातील होत्या, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.  

मात्र मराठा समाजाच्या नेत्यांनी सांगितले की EWS कोट्यामुळे मराठा आणि इतर समाजामध्ये स्पर्धा होते. त्यामुळे त्यांना वेगळा कोटा हवा आहे.  

Maratha Reservation
Manoj Jarange Patil: सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीचे समर्थन नाही, मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

मराठा कार्यकर्ते विनोद पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की मराठा समाज 2016 पासून संयमाने वागत आहे. मात्र EWS कोट्यामुळे मराठा समाज आणि अल्पसंख्याक व इतर समाजाशी स्पर्धा होते. (Latest Marathi News)

"गरीब मराठ्यांचा एक मोठा वर्ग EWS श्रेणीतून वगळण्यात आला आहे. कारण त्यांच्या शेतजमिनीचे विभाजन झाले नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर संपूर्ण उत्पन्न दर्शविले. EWS कोट्याचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक मराठ्यांना याचा लाभ मिळत नाही", असे विनोद पाटील यांनी सांगितले. 

Maratha Reservation
MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी; राहुल नार्वेकर निर्णय देणार की पुन्हा तारीख पे तारीख...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.